शिरपूर येथील बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत सावळदे ता.शिरपूर येथील दुमजली इमारतीत सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर सहा एप्रिलला दुपारी छापा टाकून पोलिसांनी दोन लाख 29 हजार रुपयांचे बनावट चलन जप्त केले. या कारवाईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह दोन युवकांना अटक करण्यात आली. संशयित स्कॅनर कम प्रिंटरचा वापर करून 500 रुपयांचे बनावट चलन छापत असल्याचे निष्पन्न झाले.

संशयित धनंजय दिलीप शिरसाट येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. दुसरा संशयित मुकेश प्रल्हाद कोळी अट्टल गुन्हेगार असून दरोड्यासह त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. गोवा राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल असून शिरपूर पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्तावही दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *