आपल्या आरोग्यव्यवस्थेत मोठा विरोधाभास आहे. एकाबाजूला गरजेपेक्षा जास्त चाचण्या, औषधे, सप्लिमेंट्सआणि उपचार मिळत असलेले लोक आहेत. तरदुसरीकडे कोट्यवधी लोकांना मात्र प्राथमिक वैद्यकीयसुविधा, आवश्यक चाचण्या व गरजेची औषधेही वेळेवरमिळू शकत नाहीत. एक व्यक्ती मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयात केवळथकवा जाणवतो म्हणून जाते. तेथे तिच्या अनेक चाचण्याकेल्या जातात. अहवालात व्हिटॅमिन डी थोडे कमी, युरिकॲसिड जास्त, कोलेस्ट्रॉल मर्यादेपेक्षा जास्त येते व काहीआकडे लाल रंगात दिसतात. काही दिवसांतच त्याव्यक्तीकडे नवीन औषधे, सप्लिमेंट्स आणि पुढीलचाचण्यांची यादी तयार असते. दुसऱ्या बाजूला, एखाद्यालहान शहरात किंवा गावात एक व्यक्ती वर्षानुवर्षेवाढलेल्या रक्तदाबासह जगत असते. तिची नियमिततपासणी झालेली नसते. औषध मिळालेले नसते,मधुमेहाचे निदान उशिरा होते. डॉक्टरांपर्यंत पोहोचणेहीकठीण असते. ती व्यक्ती अर्धांगवायूचा झटका येतो किंवातिचे मूत्रपिंड खराब झालेले असते. तेव्हाच रुग्णालयातजाते. हे दोन्ही चित्र भारताचेच आहेत. म्हणूनच असेम्हणता येईल की, भारताची अर्धी आरोग्य समस्या''ओवरट्रीटमेंट''ची आहे. अर्धी समस्या ‘अंडरट्रीटमेंट''चीआहे. शहरांमध्येत वैद्यकीय उपचार गृहितकावर चालूलागले आहेत. जास्त चाचण्या म्हणजे उत्तम इलाज,जास्त स्कॅन म्हणजे अधिक काळजी व जास्त औषधेम्हणजे चांगला उपचार, असे मानले जाऊ लागले आहे.पण वैद्यकीय शास्त्र असे सांगत नाही. प्रत्येक आजारालालगेच औषधाची गरज नसते. प्रत्येक औषध आरोग्य देतनाही. केवळ युरिक ॲसिड वाढणे म्हणजे आजार नव्हे.केवळ व्हिटॅमिन डी कमी असल्याचा रिपोर्ट म्हणजे तोआजार बनत नाही. फक्त कोलेस्ट्रॉलचा आकडा पाहूनव्यक्तीच्या हृदयाचा धोका ठरवता येत नाही. त्यासाठीवय, रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास,वजन, शारीरिक हालचाली या गोष्टीही पाहाव्या लागतात.पण वैद्यकीय पद्धत हळूहळू रुग्णावर लक्ष केंद्रितकरण्याऐवजी रिपोर्टवर लक्ष केंद्रित करू लागली. रुग्णसांगतो की त्याला बरे वाटत आहे. पण रिपोर्टमधीलएखादा आकडा सामान्य मर्यादेबाहेर असतो आणिअनेकदा तोच आकडा संपूर्ण उपचाराचा केंद्रबिंदू बनतो.इथूनच अनावश्यक निदान, उपचारांची सुरुवात होते. एकचाचणी दुसऱ्या चाचणीला जन्म देते. मग औषधे सुरूहोतात. अनेकदा ती औषधे वर्षानुवर्षे सुरू राहतात.अनावश्यक वैद्यकीय उपचार नुकसानही करू शकतात.औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. चाचण्यांचे चुकीचेनिष्कर्ष येऊ शकतात. विनाकारण केलेल्या स्कॅनमुळेचिंता वाढू शकते.उपचाराचा खर्च वेगळाच वाढतो. जास्तवैद्यकीय उपचार म्हणजे नेहमीच चांगला उपचार असतोअसे नाही. दुसऱ्या बाजूला देशाच्या अनेक भागांतपरिस्थिती अगदी उलट आहे. आजही प्राथमिक आरोग्यसेवांची उपलब्धता असमान आहे. लोकांचा रक्तदाबवर्षानुवर्षे तपासला जात नाही. मधुमेहाची ओळख उशिराहोते. गरोदर महिला, वृद्ध व जुनाट आजार पीडितांनानियमित फॉलो-अप मिळत नाही. मानसिक आरोग्याच्यासेवा मर्यादित आहेत. दुसरीकडे कोणाचा रक्तदाबही योग्यप्रकारे मोजला नाही. एका बाजूला एक व्यक्ती पाचसप्लिमेंट्स खातो. एखाद्या रुग्णाला गरजेचे एक औषधहीनियमित मिळत नाही. आपल्याला ‘फास्ट मेडिसिन'' सोबतच ‘स्लोमेडिसिन''ची समजही विकसित करावी लागेल.आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो, स्ट्रोक. गंभीरसंसर्ग , अपघात होतो किंवा तातडीने उपचारांची गरजअसते. तेव्हा फास्ट मेडिसिनची गरज असते. पण प्रत्येकसमस्या ही आपत्कालीन परिस्थिती नसते. थोडे वाढलेलेयुरिक ॲसिड, बॉर्डर-लाईन कोलेस्ट्रॉल, वयानुसार होणारेसामान्य बदल किंवा कोणतीही लक्षणे नसलेले छोटे बदलडॉक्टर आणि रुग्णाला विचार करण्यासाठी वेळ देतात.अशा वेळी आधी जीवनशैली, आहार, झोप, वजन,व्यायाम आणि देखरेख या पर्यायांचा विचार व्हायला हवा. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
- पुणे: छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर्सवर शिवरायांचे फोटो लावण्यावरून रुपाली ठोंबरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर भडकल्या!
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- सातारा: कराड-चिपळूण मार्गावर थरारक अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात एक जीप खोल दरीत कोसळली तर दुसरी उलटली, दहा प्रवासी गंभीर जखमी
- पुणे: मोरगावच्या श्री मयुरेश्वराचा दसरा सोहळा तब्बल १५ तास रंगला; दीड ते दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात उत्सव संपन्न!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!





























Subscribe to my channel




