
जळगाव : रेल्वेचा प्रवास करताना अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. यामुळे प्रवाशांना वेटिंगचे तिकीट घ्यावे लागते. गाडीत अनेक वेळा टीसीकडे विनंत्या कराव्या लागतात. तरीही तिकीट कन्फर्म होत नाही. अन् प्रवाशांचे हाल होतात. यामुळे रेल्वेने आता रेल्वेतच तिकीट कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला आहे. आता धावत्या रेल्वेतच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना आता कन्फर्म सीट दिले जाणार आहे.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० ‘हॅण्ड होल्ड टर्मिनल’ (एचएचटी) मशिन भुसावळ विभागाला प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा यांनी दिली. गाडीतच तिकीट कन्फर्म करण्याचे काम आता रेल्वेतील तिकीट निरीक्षकाकडे असेल. त्यासाठी ४५४ ‘हॅण्ड होल्ड टर्मिनल’ मशिनची मागणी नोंदवण्यात आली आहे. रेल्वेत कन्फर्म तिकिटासाठी या यंत्राचा वापर होईल.
असे होईल कन्फर्म तिकीट
रेल्वेचा प्रवास सुरू झाल्यानंतर धावत्या रेल्वेत एखादे बर्थ (सीट) रिकामे असल्यास गाडीतील तिकीट निरीक्षक त्याची एचएचटी मशीनमध्ये नोंद घेईल. त्या प्रवाशाच्या बोर्डिंग स्टेशनपासून एक ते दोन स्टेशनपर्यंत प्रतीक्षा करेल. मात्र, बराच वेळ होऊनही बर्थ रिकामाच राहिल्यास त्याची नोंद घेऊन, रिकामा बर्थ प्रतीक्षा यादीतील पुढील प्रवाशाला दिला जाईल. ही सर्व प्रक्रिया एचएचटी मशीनद्वारे ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. प्रतीक्षा यादीत सर्वात पुढे असलेल्या प्रवाशाला ते बर्थ आपोआप दिले जाईल. तसा ‘एमएमएस’ संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर पाठवला जाईल. ही सर्व प्रक्रिया होणार ऑनलाइन होणार आहे.
दंडाच्या पावत्यांची ऑनलाइन नोंद
प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना तपासणीसाकडून दंडाच्या लिखित पावत्या दिल्या जातात. जनरलचे तिकीट काढून स्लीपर बोगीत बसणाऱ्यांनाही अतिरिक्त प्रवास शुल्काची पावती घ्यावी लागते. विविध कारणांसाठी तिकीट तपासणीसाला पावत्या फाडाव्या लागतात. हे काम आता ‘एचएचटी’ यंत्राद्वारे केले जाईल. ही यंत्रे ऑनलाइन प्रणालीद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला जोडलेली असतील. प्रवाशाने पैसे दिल्यानंतर यंत्रातून त्याची पावती निघेल. त्याची ऑनलाइन नोंद रेल्वेकडे होईल. रेल्वेच्या अन्य विभागात ही यंत्रे यापूर्वी दाखल झाली असली तरी भुसावळ विभागात मात्र ८ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भुसावळ विभागात अमरावती-मुंबई ही पहिली गाडी यामुळे डिजिटल झाली आहे.
.
शहर
- मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहिल्यानगर: तुकाराम मुंढेंचा दणका: कारवाईच्या भीतीने अहिल्यानगरमध्ये 'सुट्या तेलाची' विक्री बंद; ग्राहकांमध्ये खळबळ
गुन्हा
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
























Subscribe to my channel


