जग हादरलं! हिंद महासागरात मोठी खळबळ, अमेरिकेची थेट कारवाई, सैन्याने…

अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलामध्ये मोठा हल्ला करत व्हेनेझुएलाच्या थेट अध्यक्षांना अटक केली आणि  अमेरिकेत नेले. व्हेनेझुएलाच्या तेलावर आता पूर्णपणे अमेरिकेचा ताबा आहे. तेलाच्या मुद्द्यात अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण आहे. शेवटी अमेरिकेने अथक प्रयत्नानंतर व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आता पुन्हा एकदा हिंद महासागरात तणाव बघायला मिळतोय. अमेरिकन सैन्याने हिंद महासागरात व्हेनेझुएलाशी जोडलेल्या आणखी एका तेल टँकरला अडवले आणि त्यावर ताबा मिळवत मोठी कारवाई केली. पेंटागॉनने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. व्हेरोनिका III नावाच्या या जहाजाचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी कॅरिबियन समुद्रापासून हिंद महासागरापर्यंत माग काढला. त्यानंतर जहाजाला थांबण्यास सांगितले आणि संपूर्ण तपासणी यादरम्यान करण्यात आली.

व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा ताबा असला तरीही अमेरिकेने अजूनही कारवाई काही थांबवली नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. अमेरिकेने या कारवाई दरम्यान म्हटले की, हे जहाज राष्ट्रपतींच्या आदेशानुसार लादलेल्या निर्बंधांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींना थारा देत नाही.

अमेरिकेने म्हटले की, पनामा असलेले ध्वज या तेल टँकर होता. इराण आणि व्हेनेझुएलाशी संबंधित तेल निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे अमेरिकेने म्हटले. मात्र, अमेरिकेने केलेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका मागील काही दिवसांपासून सतत व्हेनेझुएलावर कारवाई करताना दिसली. आता कुठेतरी कारवाई थांबल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा कारवाई करण्यात आली.

अमेरिकेने ज्यापद्धतीने व्हेनेझुएलामध्ये घुसून त्यांच्या देशाच्या अध्यक्षाला अटक केली त्याचा निषेध अनेक देशांनी केला. यादरम्यान काही धक्कादायक फोटोही पुढे आली. व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण असून भारताने व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करावे, असा एक आग्रही अमेरिकेचा असल्याचे कळतंय. मात्र, याबाबत भारताने आपली भूमिका असून स्पष्ट केली नाही. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला होता. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलाचा पर्याय लोकांपुढे देत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *