मी पुण्यात नवीन होतो. 2008 पर्यंत मी येथे केवळ एक पाहुणा होतो. त्या वर्षी एका प्रोजेक्टवर काम करत असताना मी माझ्या एका वार्ताहरासोबत पुण्यातील एका प्रसिद्ध व्यक्तीच्या बैठकीला पोहोचलो. ते कोणती तरी सार्वजनिक घोषणा करणार होते. बैठकीला संबोधित करणारी ती व्यक्ती पायऱ्यांवर बसली होती, जी त्यांची एक स्टाइल होती, तर सर्व वार्ताहर त्यांच्याभोवती उभे होते. असे यासाठी, कारण त्यांनी पत्रकारांना भेटण्यासाठी सर्वात स्वस्त ठिकाण बुक केले होते. माझ्यासारख्या उशिरा पोहोचणाऱ्या व्यक्तीला त्यांना पाहणेही शक्य नव्हते. मी गर्दीच्या मागे शांतपणे उभा राहिलो, कारण त्यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. त्यांचा अनोखा, आकर्षक आणि कमालीचा अधिकारयुक्त आवाज केवळ गर्दीलाच शांत ठेवत नव्हता, तर माझ्यासह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अचानक माझा फोन वाजला आणि मी तो लगेच सायलेंट केला, पण काही सेकंद वाजलेली ती कॉलर ट्यून त्या अधिकारयुक्त आवाजातील व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशी होती. चालू विषयावरून थोडे बाजूला जात त्यांनी आदेश दिला, ‘रघू, पुढे येऊन माझ्या बाजूला बस.’ कदाचित एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या ‘भगवान व्यंकटेश्वर सुप्रभातम’ या माझ्या कॉलर ट्यूनवरून त्यांनी मला ओळखले असावे - लहानात लहान गोष्टींवर त्यांची बारीक नजर असायची. मला त्यांची एक गोष्ट खूप आवडायची, ती म्हणजे लहानात लहान गोष्टीतही त्यांचा जीवन जगण्याचा अत्यंत साधा आणि जमिनीवर पाय ठेवून वागण्याचा दृष्टिकोन. एकदा ते 2003 मध्ये इंदूरला या वर्तमानपत्राच्या कार्यालयात आले आणि म्हणाले, ‘मला एका दिवसासाठी तुमची कार आणि ड्रायव्हर हवा आहे, कारण मी रायफल शूटिंगच्या प्रॅक्टिससाठी महूला जात आहे.’ त्यांनी असे कधीच विचारले नाही की, ‘तुम्ही देऊ शकता का?’ त्यांनी फक्त आदेश दिला. मी संकोचून म्हणालो, ‘दादा, माझ्याकडे तर फक्त मारुती झेन आहे, तुमच्या उंचीनुसार मोठी कार नाही.’ ते हसले आणि म्हणाले, ‘म्हणूनच तर तुमच्याकडे मागतोय.’ मी फक्त मान हलवली आणि त्यांना गाडीपर्यंत घेऊन गेलो. ऑफिसचा ड्रायव्हर खूप खूश होता, कारण तो दुसऱ्या कोणाला नाही, तर बॉलीवूड आणि मराठी रंगभूमीचे अभिनेते नाना पाटेकर यांना घेऊन जाणार होता, ज्यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात निधन झाले. आपल्या मूळ तत्त्वांमुळे आणि सामान्य लोकांविषयीच्या सखोल संवेदनांमुळे त्यांनी ऐषारामी जीवन नाकारले होते. जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची, तेव्हा ते नेहमी याबद्दल बोलायचे की ते किती भाग्यवान आहेत; गल्लीतील भिंतींवर कलाकारांचे चेहरे रेखाटणारा पेंटर म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला आणि शेवटी त्याच बिलबोर्ड््सवर ते स्वतःचा चेहरा पाहू शकले. बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल की त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित जे. जे. स्कूल ऑफ आर्ट््समधून स्केच आर्टिस्ट आणि कॅलिग्राफरचे प्रशिक्षण घेतले होते. नंतर करिअरमध्ये चांगली कमाई असूनही, त्यांनी त्याच 750 चौरस फुटांच्या घरात राहणे पसंत केले- ज्यात साध्या पांढऱ्या भिंती आणि साधे लाकडी फर्निचर होते - कारण त्यांनी आलिशान सेलिब्रिटी लाइफस्टाइल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांना वाचन आणि लेखन आवडायचे आणि ते गावाकडच्या शांत जीवनाला प्राधान्य द्यायचे. शेतकऱ्यांच्या दुर्दशेने व्यथित झालेल्या आणि आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा त्यांच्या कल्याणासाठी खर्च करणाऱ्या या माणसाने एकदा मला सांगितले होते, ‘मी अभिनय यासाठी करतो कारण त्यातून माझी बिले भरली जातात. जेव्हा पैसे संपतात, तेव्हा मी एखाद्या निर्मात्याला फोन करून एखाद्या भूमिकेसाठी विचारतो. नाहीतर तुमच्यासारखे माझे शेकडो मित्र आहेत, जे मला किमान एका दिवसाचे जेवण तरी देतील आणि तुमचा पुढचा नंबर थेट एका वर्षानंतरच येईल.’ त्यांना नेहमी लाखो लोकांशी, विशेषतः शेतकरी वर्गाशी जोडले जायचे होते. कारण त्यांना वाटायचे की यामुळे ‘त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांना खांदा देण्यासाठी खूप लोक उपस्थित राहतील.’ फंडा असा की, आयुष्याची खरी संपत्ती यात नाही की पैशाने तुम्ही काय विकत घेऊ शकता, तर यात आहे की तो दुसऱ्याचे दुःख कमी करण्यात कशी मदत करू शकतो. तुमची कमाई तुमची बिले भरू शकते, पण तुमच्याकडे जे काही आहे, ते वाटल्याने दुसऱ्याचे ओझे नक्कीच हलके होऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



