काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या यवोन बेलगार्ड्ट यांना कार चालवताना एक विचित्र अनुभव आला. त्यांच्या सासूबाईंनी आणि त्यांनी सीट बेल्ट लावला होता. सासूबाई गाडी चालवत नसल्यामुळे त्वचेला खाज आल्यावर जसे कोणीही करते तसे त्यांनी नाक खाजवले असावे. त्या क्षणी त्यांच्या हाताने सीट बेल्टचा वरचा भाग झाकला गेला. एआय-असिस्टेड कॅमेऱ्याने हा फोटो असा टिपला, जणू त्यांनी सीट बेल्ट नीट घातलेला नाही. बेलगार्ड्ट यांच्यावर 1200 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि त्यांच्या लायसन्सवर 4 डी-मेरिट पॉइंट्स दिसू लागले. आणखी एक रहिवासी लिसा टेलर जेव्हा वाहन चालवत होत्या तेव्हा एआय कॅमेऱ्याने त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा फोटो काढला, जिने सीट बेल्ट दंडाखाली घेतला होता. टेलर म्हणाल्या की, थांबत थांबत चालणाऱ्या वाहतुकीतही त्या रस्त्यावरून नजर हटवू शकत नव्हत्या, जेणेकरून आपली मुलगी सीट बेल्ट कसा लावून बसली आहे हे त्या पाहू शकतील. याच देशातील आणखी एका रहिवासी महिलेसोबत अशीच एक घटना घडली. मिली बार्टलेट यांच्यावर तेव्हाही दंड आकारण्यात आला, जेव्हा कॅमेऱ्याच्या फोटोत स्पष्ट दिसत होते की त्यांनी सीट बेल्ट नीट घातला आहे. कडक उन्हामुळे ब्लॅक अँड व्हाइट फोटोत सीट बेल्ट पांढरा दिसत होता आणि तो त्यांच्या कपड्यांमध्येच मिसळून गेला होता. अशा प्रकरणांची वाढती संख्या सांगते की, याकडे केवळ तांत्रिक त्रुटी म्हणून दुर्लक्ष करणे कठीण आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियात एआय कॅमेऱ्याद्वारे पकडण्यात आलेल्या सीट बेल्ट उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 3000 चालकांनी पहिल्या रिपोर्टिंग कालावधीतच अपील केले. यापैकी सुमारे 60% अपील यशस्वी ठरले. 20 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे दंड मागे घेण्यात आले. सप्टेंबरपर्यंत अशी शेकडो प्रकरणेही निकाली काढण्यात आली, ज्यामध्ये पोलिस प्रोसिक्युटर्सनी मान्य केले की यात दोष सिद्ध होण्याची कोणतीही उचित शक्यता नाही. तुम्ही विचार करत असाल की आपल्याला इथे ऑस्ट्रेलियाचे संदर्भ का वाचावे लागत आहेत. कारण आता भारतातही असेच होऊ लागले आहे. 15 सप्टेंबर रोजी सौविक दत्ता बेंगळुरूमध्ये आपल्या पत्नीची स्कूटर चालवत होते आणि त्यांच्या पाठीवर गिटार बांधलेली होती. ‘मागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या’ आरोपाखाली दत्ता यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चलनासोबत पुरावा म्हणून फोटोही जोडला होता, जो आऊटर रिंग रोडवरून जाताना काढला गेला होता. एआय कॅमेऱ्याला वाटले की ती लांब गिटार एखादा प्रवासी आहे आणि त्याने ट्रॅफिक नियमांनुसार हेल्मेट घातलेले नाही. साहजिकच, कॅमेऱ्याने गिटारला मागे बसलेला प्रवासी समजण्याची चूक केली. दत्ता यांनी हे चलान सोशल मीडियावर शेअर केले. बेंगळुरूसारख्या अनेक शहरांमध्ये एआय-नियंत्रित कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जिथे दंड आकारण्यासाठी मानवी तपासणी होत नाही. सोशल मीडियावर बेळगाव जिल्ह्याशी संबंधित आणखी एक घटना शेअर होत आहे. यामध्ये कथितरीत्या एआय कॅमेऱ्याद्वारे फोटो काढल्यानंतर एका कार मालकाला ‘हेल्मेट न घातल्याबद्दल’ 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कारमालकाने यावर प्रतिक्रिया देताना एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तो हेल्मेट घालून कार चालवताना दिसत आहे. मी अशा लोकांना पाहिले आहे, ज्यांची ब्रेस्ट कॅन्सर किंवा पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे आणि ते सीट बेल्ट हाताखालून घेतात. रस्त्यावर उभा असलेला पोलिस त्यांना थांबवतो. पण जेव्हा ते पट्टी दाखवतात तेव्हा त्यांना सोडून दिले जाते. एखादा कॅमेरा गिटारचा अतिशय अचूक फोटो घेऊ शकतो. तो बेल्ट, हात किंवा मूल अगदी अचूकपणे ओळखू शकतो. पण संदर्भ समजून घेणे ही डिटेक्शनपेक्षा वेगळी गोष्ट आहे. मानवी मेंदूप्रमाणे कॅमेरा हे विश्लेषण करण्यात अपयशी ठरला की, एखाद्या दुचाकीस्वाराच्या पाठीवर बांधलेली गिटार म्हणजे प्रवासी नाही, शस्त्रक्रियेनंतर सीट बेल्ट हाताखालून घेणे हे जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन नाही, नाक खाजवणारा प्रवासी सीट बेल्ट न लावताच बसला असेल असे नाही आणि एखाद्या मुलाने बेल्ट सरकवला याचा अर्थ ड्रायव्हरने जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन होऊ दिले असा होत नाही. ‘मी काय पाहत आहे?’ याचे उत्तर देण्यात तंत्रज्ञान असामान्यपणे चांगले असू शकते. पण ‘नेमके काय घडले होते?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आजही माणसांचीच गरज आहे. फंडा असा आहे की, जे लोक विचार करतात की एआय त्यांची नोकरी हिरावून घेईल, त्यांच्यासाठी ही उदाहरणे या वस्तुस्थितीला अधिक बळकट करतात की, एआय मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करू शकत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





pkgb777 is a gem. I appreciate how transparent they are with their rules and promotions. It makes the whole gaming experience much more relaxing and trustworthy.