संजू सॅमसनने खरंच चूक केली का? संघाला चांगली सुरूवात की पायावर मारला धोंडा!Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माचा जोडीदार संजू सॅमसन असेल यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका संजूच्या जागेसाठी स्पीडब्रेकर ठरली. या मालिकेत हवी तशी कामगिरी करू न शकल्याने संजू सॅमसनने संघातील जागा गमावली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप बेंचवरच बसून पाहावा लागेल अशी वेळ आली. पण दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी ट्विस्ट आला. अभिषेक शर्माची तब्येत बिघडली आणि संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली. खरं तर संजू सॅमसनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. कारण संजूला संधीचं सोनं करून या स्पर्धेत प्लेइंग 11मध्ये जागा मिळण्याची नामी संधी होती. पण संजू सॅमसनला त्यात अपयश आलं. खरं तर त्याने टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. मागचा रेकॉर्ड चांगला असता तर त्याची ही खेळी चालून गेली असती. पण त्याला संघात जागा मिळवायची असेल तर मोठी खेळी करण्याशिवाय पर्याय नाही.
संजू सॅमसन नामिबियाविरुद्ध 22 धावांची खेळी करून बाद झाला. त्याने 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 22 धावा केल्या. त्याने 275 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याने या धावा षटकार आणि चौकाराने केल्या हे विशेष..संजू सॅमसनने पहिले तीन चेंडू निर्धाव घालवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार मारत खातं खोललं. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने आक्रमक बाणा दाखवला. त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला. पण पाचव्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला. खरं तर बॅटच्या मधोमध फटका लागला होता. पण ताकद नसल्याने मिड विकेटला झेल बाद झाला.
संजू सॅमसनसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा होता. कारण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप सामना खेळला होता. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाचा भाग होता. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. संजू सॅमसनने 31 वर्षे 93 दिवसांचा असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत डेब्यू केलं. टी20 वर्ल्डकपमध्ये डेब्यू करणारा वयस्कर फलंदाज ठरला. संजू सॅमसन पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातही खेळू शकतो. कारण अभिषेक शर्मा फिट नसल्याचं सूर्यकुमारने आधीच सांगितलं आहे. पण या सामन्यात चूक करून चालणार आहे. कारण हा हायव्होल्टेज सामना असून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यात फेल गेला तर त्याचं टीम इंडियातील करिअर संपुष्टात येईल.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



