सर्व हुकूमशहा उन्मत्त असतात. कारण ते कधीच निवृत्तहोण्याचा विचार करत नाहीत. आज सत्तेत असताना तेआपल्या प्रजेचे नशीब ठरवत असतील, पण उद्या जेव्हासत्ता जाईल तेव्हा त्यांचे काय होईल हे ते ठरवू शकतनाहीत. यामुळेच पाकिस्तानचे सर्व हुकूमशहा एका विशिष्टकाळानंतर उन्मादग्रस्त झाल्याचे दिसतात. हा उन्माददिसायला साधारणपणे 5 ते 7 वर्षे लागतात. पण असीममुनीर यांच्याबाबतीत हे ‘टी-20’ च्या वेगाने घडत आहे.‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मुनीर यांनी स्वतःकडे आणखीअधिकार आणि पदे घेतली आहेत. मात्र, नुकतेचपाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने लष्कराशी संबंधित दोनकायद्यांवर ज्या प्रकारे मोहोर उमटवली त्याने सत्ताकारणावरबारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले. पाकिस्तान सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नॅशनलकमांड ॲथॉरिटी अॅक्ट 2010’ मधील सुधारणा आणि नव्या‘डिफेन्स फोर्सेस अॅक्ट 2026’ ला मंजुरी दिली गेली. हेकायदे थेट नॅशनल असेंब्लीत मांडले गेले. अवघ्या 30मिनिटांत ते मंजूर करून सभागृहाचे कामकाज तहकूबकरण्यात आले. सत्ताधारी आघाडीतील दुसरा सर्वात मोठापक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने आक्षेप घेतला.पण त्यांनी कायद्याच्या बाजूनेच मतदान केले. पीपीपीच्याराष्ट्रपतींनी त्यावर पटापट स्वाक्षऱ्याही केल्या. पाकिस्तानच्या घडामोडींचे काही अभ्यासक म्हणतील की,हे कायदे त्या 27 व्या घटनादुरुस्तीलाच मागील तारखेपासून(नोव्हेंबर 2025) लागू करतात. या अंतर्गत राज्यघटनेचीमोडतोड करून ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’(सीडीएफ) हे पद तयार करण्यात आले होते. आणि हे पदफक्त लष्करप्रमुखांनाच मिळेल, असे ठरवण्यात आलेहोते. यामुळे मुनीर यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2030 पर्यंतवाढला आहे. त्यांना आजन्म ‘फील्ड मार्शल’ बनवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर कधीही कोणताही खटला चालवला जाऊ शकत नाही, अशी व्यवस्था केली गेलीआहे. मुनीर यांनी जे जादा अधिकार बळकावले आहेत ते भयंकर आहेत. हे अधिकार प्रचंड असुरक्षिततेची भावनाकिंवा दहशतीतून निर्माण झालेल्या उन्मादामुळेचमिळवण्यात आले आहेत. प्रत्येक हुकूमशहाला एका काळानंतर स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागते. मुनीर यांच्यात ही भीती वेळेआधीच निर्माण झाली आहे. नव्या कायद्यांनुसार मुनीर जवानांना आपल्या मर्जीने ‘हायर,फायर आणि रिटायर’ करू शकतात किंवा त्यांचाकार्यकाळ वाढवू शकतात. हे ते फक्त निष्ठावान सुभेदार,मेजर किंवा कर्नल यांच्यासोबतच नाही, तर समकक्ष अधिकाऱ्यांसोबतही करू शकतात. ते आपल्या कोणत्याही जनरलला, विशेषतः कोर कमांडरला निवृत्त करू शकतात किंवा त्यांचा कार्यकाळ वाढवू शकतात. यामुळे एकतर हेलोक त्यांना घाबरू लागतील. दुसरे म्हणजे ते लालची बनू शकतात. कोर कमांडर्समध्ये अस्वस्थता आणि कुजबूज वाढली आहे. मुनीर सर्वांच्या वर जाऊन बसले आहेत आणिउत्तराधिकारी होण्याचा मार्गच बंद झाला आहे. एक जुनी समजूत आहे की, सर्व हुकूमशहा एकाकी आणि घाबरलेलेअसतात. मुनीर ज्या भीतीने ग्रस्त आहेत त्याला‘अॅक्रोफोबिया’ म्हणजेच उंचीची भीती म्हटले जाऊशकते. ते खूप लवकर खूप उंचीवर जाऊन बसले आहेत.आता याहून वर कुठे जायचे किंवा इथून खाली तर पडणारनाही ना, हे त्यांना समजत नाही. पाकिस्तानची राष्ट्रीय ताकद कमी होत चालली आहे. तीकेवळ त्यांच्या लष्करावरच अवलंबून राहिली आहे. त्यांचीअर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सौदी अरेबियाकडूनमोठी मदत कशी मिळवायची याव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेतप्राण फुंकण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. पणसौदी अरेबिया स्वतः कर्जात बुडालेला आहे. तो 1-2 अब्जडॉलर्सपेक्षा जास्त मदत देऊ शकत नाही. ती मदतही लष्करीसेवांच्या बदल्यात केवळ उपकार म्हणून असते. तसेहीनुसती अपेक्षा ठेवणे म्हणजे नियोजन नव्हे. लष्करालाहीकाही मर्यादा आहेत. ते पश्चिम सीमेवरील बंडाळ्या मोडूनकाढू शकत नाही किंवा लष्करी बाबतीत भारतावर कुरघोडीकरू शकत नाही. ते अधूनमधून एखादा वाद उभाकरण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच करू शकत नाही. मुनीरयांचे प्राबल्य लष्करी प्रकरणांमध्ये नाही. पण लष्कराच्याविळख्यात अडकलेल्या त्यांच्या देशातील भ्रष्टराजकारणाची त्यांना सखोल समज आहे. त्यांनाधोक्यांचाही अंदाज आहे. हे काही सामान्य राजकारणनाही. यासाठी मी तीन शब्द सुचवू शकतो - गळेकापू,पाठीत खंजीर खुपसणारे किंवा निर्दयी. मुनीर आपलेभविष्य सुरक्षित करू शकत नाहीत. त्यांना आपलावर्तमानकाळ सुरक्षित ठेवण्याचीच काळजी सतावतराहील. पण हे नवे कायदे त्यांच्या छातीवर आणखी एकाचिलखताचेच काम करतील. मुनीर 58 वर्षांचे आहेत.लष्करप्रमुख म्हणून त्यांचे 5 वे वर्ष सुरू आहे. 30 नोव्हेंबर2030 रोजी जेव्हा त्यांचा 5 वर्षांचा नवा कार्यकाळ संपेलतेव्हा ते केवळ 62 वर्षांचे असतील. या वयात भारताचेलष्करप्रमुख निवृत्त होतात. 2030 नंतर ते कुठे जाणार, हेत्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल. अनेक पाकिस्तानीलोकांना वाटते की, याच्या खूप आधीच ते स्वतःलाराष्ट्रपती घोषित करतील. आणि या पदावर त्यांचा कोणताहीनिश्चित कार्यकाळ नसेल. म्हणजेच ते आयुष्यभर सत्तेतराहू शकतात. ते कदाचित बरोबर विचार करत असतील.पण त्यांच्या आधीच्या हुकूमशहांचा इतिहास हेच सांगतोकी, वेळ कोणासाठीही थांबत नाही. कोणत्याही पाकिस्तानीहुकूमशहाचे तीनच शेवट असू शकतात - तुरुंग, हद्दपारीकिंवा हत्या. माझ्या या भविष्यवाणीवरून मुशर्रफ यांनी मलाएकदा ‘फटकारले’ देखील होते. दावोसच्या परिषदेतमाझ्याकडे बोट दाखवत त्यांनी हुकूमशहांच्या या तीनशेवटांबाबतच्या माझ्या विश्लेषणाकडे लक्ष वेधले होते. तेम्हणाले होते की, एक काळ असा होता जेव्हा तुमच्याविश्लेषणाला किंमत होती, पण आता नाही. ते म्हणाले होते,‘तुम्ही चुकीचे आहात, कारण तुम्ही मला हुकूमशहा मानता.मी हुकूमशहा नाही, तर लोकशाहीवादी आहे.’ खरे तरहुकूमशाही आणि मतिभ्रम या दोन्ही गोष्टी हातात हातघालून चालतात. मी मुनीर यांच्या भविष्याचा अंदाजलावला तर ज्या शक्यता दिसतात, त्यात निवृत्त होऊन घरातबसणे आणि गोल्फ खेळत वेळ घालवणे हे निश्चितचसमाविष्ट नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मुनीरही त्याच वाटेवर आहेत...अयुब खान आणि याह्या खान यांनी 1965 आणि1971 मध्ये लष्करी अतिसाहस करून स्वतःच्याविनाशाला आमंत्रण दिले. झिया-उल-हकसत्तेच्या शिखरावर असतानाच दुर्दैवाचे बळीठरले. परवेझ मुशर्रफ यांची अवस्था अशी झालीकी, त्यांना देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावेलागले. मग भविष्य मुनीर यांच्याशी वेगळ्याप्रकारे का वागेल?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



