भारतात आतापर्यंत व्यवहाराच्या अखेरच्या अर्ध्या तासातील खंड-भारित सरासरीच्या (Volume Weighted Average Price) आधारे क्लोजिंग किंमत निश्चित केली जात होती. मात्र, प्रथमच लंडन, फ्रँकफर्ट, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कसारख्या आघाडीच्या जागतिक बाजारपेठांप्रमाणे क्लोजिंग ऑक्शन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या पद्धतीत दिवसअखेरीस बाजारातील सर्व खरेदी-विक्रीचे आदेश एकत्रित केले जातात आणि त्यावरून प्रत्येक समभागासाठी एकच अंतिम किंमत निश्चित केली जाते. पहिल्याच दिवशी ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पडली. क्लोजिंग ऑक्शनची पद्धत वापरणाऱ्या इतर बाजारपेठांमध्ये जसा अनुभव आला आहे, तसाच अनुभव भारतातही दिसून आला. सर्वाधिक तरलता असलेल्या एक्स्चेंजवरच बहुतांश व्यवहार केंद्रित झाले. दिवसअखेरीस क्लोजिंग ऑक्शनमधील जवळपास सर्व व्यवहार NSE वर झाले. त्यामुळे बाजारातील सर्व क्लोजिंग ऑर्डर्स एका व्यासपीठावर एकवटल्या. एकत्रित खरेदी-विक्रीच्या कलानुसार क्लोजिंग किंमत निश्चित झाली. खरेदीचा दबाव अधिक असल्यास किंमत वाढली, तर विक्रीचा दबाव अधिक असल्यास ती घसरली. नियोजनानुसार राबविलेल्या क्लोजिंग ऑक्शनने आपले मूलभूत उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य केल्याचे यातून स्पष्ट झाले. व्यवहारांचा मोठा हिस्सा एका एक्स्चेंजवर केंद्रित होणे अपेक्षितच होते. कारण ऑक्शनमध्ये प्रत्येक एक्स्चेंजवर प्रत्येक समभागासाठी एकच किंमत निश्चित होते आणि त्या किमतीचे महत्त्व व्यवहाराच्या खंडावर अवलंबून असते. त्यामुळे ज्या व्यासपीठावर समोरचा व्यवहारकर्ता सहज उपलब्ध होईल. तिकडेच बाजारातील सहभागी आपले क्लोजिंग ऑर्डर्स वळवतात. व्यवहाराचा मोठा खंड आणखी व्यवहारांना आकर्षित करतो. अधिकृत क्लोजिंग किमतीवर व्यवहार करणे आवश्यक असलेल्या इंडेक्स फंड्स आणि ETF साठीही व्यवहार अनेक एक्स्चेंजमध्ये विभागण्यापेक्षा अधिक तरलता असलेल्या व्यासपीठावर राहणे अधिक सोयीचे ठरते. हाँगकाँगमध्ये क्लोजिंग ऑक्शन सुरू झाल्यानंतर आणि त्याआधी युरोपातील अनेक एक्स्चेंजमध्येही हाच अनुभव आला होता. SEBI च्या समान नियामक चौकटीत काम करणाऱ्या भारतीय एक्स्चेंजमध्येही सहभागी तरलतेच्या आधारेच व्यवहाराचे व्यासपीठ निवडत असल्याचे दिसून आले. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात मात्र चित्र काहीसे वेगळे होते. क्लोजिंग विंडोदरम्यान फ्युचर्स विभागातील सहभाग आणि व्यवहाराची खोली रोखीच्या ऑक्शनच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे फ्युचर्स बाजाराची क्लोजिंग किंमत रोखीच्या बाजाराशी अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे सुसंगत राहिली नाही. रोख आणि फ्युचर्स बाजारातील किमतींमध्ये समतोल राखणाऱ्या ट्रेडिंग डेस्कनी सावध भूमिका घेतली. प्रत्यक्ष व्यवहारात यापूर्वी कधीही न वापरलेल्या व्यवस्थेत मोठी जोखीम घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी आपला सहभाग मर्यादित ठेवला आणि संपूर्ण प्रक्रिया प्रथम निरीक्षणाखाली ठेवली. या व्यवस्थेची सवय झाल्यानंतर त्यांचा नियमित सहभाग पुन्हा वाढेल. त्यानंतर रोख आणि फ्युचर्स बाजारातील सुसंगतीही पूर्ववत होईल. जगातील प्रत्येक बाजारपेठेत क्लोजिंग ऑक्शनची अंमलबजावणी प्रथमच करताना असा अल्पकालीन विलंब दिसून आला आहे आणि तो काही दिवसांतच दूर झाला आहे. कार्यान्वयनाच्या दृष्टीने हा दिवस पूर्णपणे सुरळीत पार पडला. एवढ्या मोठ्या बदलासाठी याहून चांगला प्रारंभ अपेक्षित असू शकत नाही. कोणतीही तांत्रिक अडचण किंवा ताळमेळातील त्रुटी आढळली नाही. क्लोजिंग ऑक्शनने दिवसअखेरीस बाजारातील सर्व व्यवहारांचे यशस्वीपणे एकत्रीकरण केले. त्यानंतर क्लोजिंग किंमतींची गणना करून त्या तातडीने प्रसारित करण्यात आल्या. दलाल, क्लिअरिंग हाऊस आणि डिपॉझिटरीज यांच्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम फाइल्सही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पाठविण्यात आल्या. मात्र, ही केवळ पहिली ट्रेडिंग सत्र होती, हे लक्षात घ्यायला हवे. बहुतांश ट्रेडिंग डेस्कनी किंमत कशी निश्चित होते, हे प्रथम पाहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुतेक ऑर्डर्स ऑक्शनच्या अखेरच्या टप्प्यात दाखल झाल्या. सर्व विभागांतील सहभागही नेहमीपेक्षा अधिक सावध होता. पहिल्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे. व्यवस्थेची सवय झाल्यानंतर हे चित्र बदलेल. ट्रेडिंग डेस्क लवकर ऑर्डर्स देऊ लागतील, बाजारातील व्यवहाराचा खंड वाढेल, फ्युचर्स आणि रोख बाजारातील संबंध अधिक मजबूत होतील आणि क्लोजिंग ऑक्शनची प्रक्रिया दैनंदिन व्यवहाराचा नियमित भाग बनेल. ज्या बाजारपेठांमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली, तेथे काहीच सत्रांमध्ये अशी स्थिरता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा बदल सूक्ष्म असला तरी त्याचे महत्त्व मोठे आहे. म्युच्युअल फंडांच्या NAV, निर्देशांकांची गणना आणि सेटलमेंटसाठी वापरली जाणारी क्लोजिंग किंमत आता केवळ गणिती सरासरी राहिलेली नाही. ती बाजारातील सर्व सहभागींच्या एकत्रित व्यवहारातून ठरलेली प्रत्यक्ष बाजारभाव आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तीवर तिची निर्मिती होते. त्यामुळे तिची पडताळणी करता येते आणि त्या किमतीमागे प्रत्यक्ष खरेदीदार व विक्रेते उभे असतात. पहिल्याच दिवशी हा बदल सुरळीतपणे अमलात आला. आगामी सत्रांमध्ये ही पद्धत बाजाराच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनेल. त्यातून भारतीय भांडवली बाजार जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी अधिक सुसंगत होईल. (डॉ. शण्मुगम यांनी कृषी अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. ते कमोडिटी बाजार, आर्थिक नियमन आणि भांडवली बाजार धोरणाचे अभ्यासक आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




