Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असतानाच आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. सोबतच त्यांनी राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणीही पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांनी नेमकी काय माहिती दिली?
शरद पवार यांनी रुबी रुग्णालयाच्या बाहेर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले आहे. “मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोणीही हॉस्पिटलला येऊ नये. रुग्णालयात इतरही काही रुग्ण आहेत. डॉक्टरांनी सांगितले सांगितल्याप्रमाणे शरद पवार हे आयसीयूमध्ये नाहीयेत. एका प्रायव्हेट रुममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वत:चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाहीये. गेल्या 12 ते 13 दिवसांत शरद पवार यांचा शारीरिक ताण वाढला आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.
दोन दिवस रुग्णालयात ठेवलं जाणार?
तसेच, पवार साहेब यांना कफ झालेला आहे. पुढच्या काही काळात रिपोर्ट येतील. माझ्या अंदाजाप्रमाणे शरद पवार साहेबांना रुग्णालयातच एक ते दोन दिवस ठेवलं जाईल. कृपा करून इतर रुग्णांच्या हितासाठी कोणीही रुग्णालयात येऊ नये. पवार साहेबांशी कोणालाही भेटता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
उपचारासाठी मुंबईत नेले जाणार का?
या रुग्णालयाचे जे नियम आहेत ते योग्य पद्धतीने पाळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तपासणीचे रिपोर्ट समोर आल्यावरच शरद पवार यांच्यावर पुण्यातच उपचार केले जाणार की त्यांना मुंबईत नेले जाणार हे ठरवले जाईल, असेही यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
[embedded content]
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


