राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला नशेखोरीचा विळखा बसला आहे. या विळख्यातून मुंबईला मुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. सध्या मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रेल्वे पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक पाऊले उचलल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी कोट्यवधींचे चरस जप्त केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बोरिवलीत भाजप नगरसेवकाने स्वतः मैदानात उतरून नशेचा अड्डा उध्वस्त केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या नशामुक्त मुंबईसाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त आघाडी उघडल्याचे चित्र दिसत आहे.
वांद्र्यात मोठी कारवाई
मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेसमधून होणाऱ्या एका मोठ्या चरस तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी दुपारी 4.15 वाजता ही गाडी वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ४ वर आली होती. असे असताना एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याला जनरल डब्यात एक बेवारस संशयास्पद बॅग आढळली होती. ही माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या बॅगेची तपासणी केली असता त्यात चरसचे ३१ पॅकेट्स सापडले. या चरसचे एकूण वजन १३ किलो ८३४ ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त पाहून आरोपी बॅग सोडून पसार झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान २०२६ या वर्षांत इतक्या मोठ्या चरसचा साठा पकडण्याची रेल्वे पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहेत.
बोरिवलीत दोन तरुणांना चोप
तर दुसरीकडे, बोरिवली पश्चिम येथील ओल्ड एम.एच.बी. कॉलनी परिसर नशेबाजांचा अड्डा बनल्याच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्वतः मध्यरात्री या परिसरात धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन तरुण गांजा ओढताना रंगेहाथ पकडले. यावेळी नगरसेवकांनी या तरुणांना चोप देत त्यांच्याकडील गांजाचा साठा जप्त केला. नगरसेवक शिवा शेट्टी यांनी तातडीने भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडीओ कॉलद्वारे माहिती दिली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या बोरिवली विधानसभा क्षेत्र नशा मुक्त करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी स्वतः रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. याला बोरिवली पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




