मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत आज अखेर धक्कादायक निकाल लागला. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगिता खांडेकर अवघ्या एका मताने महापौर झाल्या. चंद्रपूर महागनरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की सहन करावी लागणार आहे. चंद्रपूरच्या महापौर पदावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद दिल्ली दरबारी गेला होता. या वादामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी काही दगाफटका होऊ शकतो अशी भिती होती, ती खरी ठरली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपला आपला महापौर बनवण्यात यश मिळालं आहे.
ऐनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला हात दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला बहुमताचं गणित जुळवता आलं नाही. वंचित आणि MIM च्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीने चंद्रपुरात भाजपसाठी काही गोष्टी अजून सोप्या झाल्या. चंद्रपूरच्या या निकालावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
आता यांच्याकडे नेमकं उत्तर काय आहे?
“चंद्रपूर महापालिकेत उबाठाच्या नगरसेवकांनी स्वमताने निर्णय घेतला आहे. मात्र मनसेचे नगरसेवक गेले की काहींचे पोट दुखते. राज ठाकरे यांची भेट घेतली तर त्यांना ते चालत नाही. आता यांच्याकडे नेमकं उत्तर काय आहे?” असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “उद्या अमित शहा यांचा फोन आला तर हे पळत दिल्लीला जातील, विमानाचीही वाट पाहणार नाहीत. बोलणं हा गुण संजय राऊत यांनी शरद पवारांकडून घेतलेला आहे”
आमचं वैचारिक वैर आहे
“आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून गेलो, पण पक्ष संभाळला. मात्र यांना लाचारी करावी लागत आहे. कोणीतरी पदरात घ्यावं म्हणून त्यांची धडपड सुरू आहे,” अशी टीकाही शिरसाट यांनी केली.“अनेक वर्षे एका नेत्यासोबत काम केल्यामुळे नाव येतं. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध होता. आमचं वैचारिक वैर आहे आणि ते कायम राहणार आहे” असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शहर
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
महाराष्ट्र
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
गुन्हा
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स

























Subscribe to my channel



