मेघना पंत यांचा कॉलम:रस्त्यांवर मुलींचाही तितकाच अधिकार आहे, जितका पुरुषांचा‎

‎‎‎‎‎‎‎‎भारतात मुलींना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या‎सल्ल्यांमध्ये असे काहीतरी आहे, जे आपल्या समाजाबद्दल‎बरेच काही उघड करते. ते म्हणजे, कुणाच्या नादी लागू‎नको, वाद घालू नको, प्रतिक्रिया देऊ नको, त्याला जाऊ दे,‎त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नको, सावध राहा. हे सर्व‎सल्ले व्यावहारिक वाटतात, पण ते थकवणारे आहेत.‎कारण यामागे अशी धारणा आहे की महिलांना पुरुषांच्या‎आक्रमकतेचा सामना करायला शिकावे लागेल. एखादी‎महिला जेव्हा "नाही'' म्हणते, तेव्हा तिच्याकडून सर्वात‎आधी हीच अपेक्षा केली जाते की तिने आपल्या निर्णयाचे‎कारण सांगावे. दुसरी गोष्ट, तिने वाटेतून बाजूला व्हावे.‎आणि तिसरी गोष्ट, तिने हे ठरवावे की ज्या पुरुषाला तिने‎"नाही'' म्हटले आहे, तो रागावणार नाही. नुकतीच‎गुरुग्राममध्ये घडलेली रोड-रेजची घटना ही बाब स्पष्टपणे‎समोर आणते. ही घटना सियासोबत घडली. तिच्या मते, ती‎बाईक चालवत होती, तेव्हाच एका कारने तिचा पाठलाग‎सुरू केला. तिने ड्रायव्हरला अंतर ठेवून गाडी चालवण्यास‎सांगितले, पण वाद वाढत गेला. तिचा आरोप आहे की‎कारने तिच्या बाईकसमोर अचानक दिशा बदलली, ज्यामुळे‎ती रस्त्यावर पडली. संपूर्ण घटना बाईकवर लागलेल्या‎कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाली. ही कहाणी रस्त्याच्या कडेला‎झालेल्या आणखी एका गुंतागुंतीच्या वादात बदलली असती‎: सुरुवात कोणी केली? कोण चुकीच्या पद्धतीने गाडी‎चालवत होते? ही केवळ एक दुर्घटना होती का? हे रोड-रेज‎होते का? महिलांनी गाडी चालवावी का? पण त्या फुटेजने‎महिलेला अशी गोष्ट दिली, जी अनोळखी व्यक्तींसोबत‎होणाऱ्या वादात त्यांच्याकडे सहसा नसते- म्हणजेच‎खरोखर काय घडले, याचा पुरावा. आरोपीने म्हटले की‎त्याने मुद्दाम धडक मारली नव्हती आणि धडक अपघाताने‎झाली. पण नंतर पोलिसांनी पुराव्यांची तपासणी केल्यानंतर‎त्याला अटक केली आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल‎केला. बिहारचे जमुई प्रकरण ही बाब आणखी‎चिंताजनक पद्धतीने समोर आणते. एक विद्यार्थिनी आणि‎तिचा वर्गमित्र कोचिंगवरून परतत होते, तेव्हाच त्यांना‎वाटेत अडवले. त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले.‎संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाली आणि नंतर याच‎आधारे पोलिसांनी कारवाई केली. आतापर्यंत आठ जणांना‎अटक झाल्याची बातमी आहे. त्यामुळे, कॅमेरा महत्त्वाचा‎ठरतो. रस्ते अशी जागा बनताहेत जिथे मुलींकडून केवळ‎रहदारीच नाही, तर पुरुषांच्या अधिकार गाजवण्याच्या‎वृत्तीचाही सामना करण्याची अपेक्षा केली जाते. गुरुग्रामच्या‎घटनेत प्रश्न हा आहे की जेव्हा एखाद्या वादादरम्यान‎एखादी महिला आपली जागा, आपले अधिकार किंवा‎आपली प्रतिष्ठा सोडण्यास नकार देते, तेव्हा काय होते.‎काही लोकांसाठी एखाद्या महिलेचे पॉवरफुल बाईक‎चालवणे आजही इतके असामान्य आहे की ते याला‎चिथावणी म्हणून घेतात. जेव्हा एखादी महिला म्हणते-‎अंतर ठेवा, तेव्हा याला रस्त्यावर दिलेली एक सामान्य‎सूचना म्हणून घेण्याऐवजी आव्हान किंवा उद्दामपणा म्हणून‎पाहिले जाते. ही मोठी समस्या आहे. महिलांनी रस्त्यावर‎कसे वागावे, यावर आणखी एका लेक्चरची गरज नाही.‎भारतातील महिलांना विचारा की त्यांना सार्वजनिक‎ठिकाणी कसे वाटते आणि बहुतांश महिला सांगतील की‎त्यांना स्वतःला असुरक्षित वाटते. हे धोकादायक आहे,‎कारण याचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि आर्थिक‎स्वातंत्र्यावर होतो. सूड उगवण्याच्या किंवा नुकसानीच्या‎भीतीने महिला घरातच राहतात किंवा रस्त्यावर नेहमी‎अत्यंत सतर्क राहतात. या किमतीकडे आपण दुर्लक्ष करू‎शकत नाही. (हे लेखिकेचे स्वतःचे विचार आहेत)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *