अभिनेत्री मलायका अरोराचं खासगी आयुष्य हे जणू एखाद्या खुल्या किताबासारखंच आहे. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती 12 वर्षांनी लहान अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. हे दोघं जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. वयात इतकं मोठं अंतर असूनही अर्जुन-मलायकाची केमिस्ट्री आणि जोडी अनेकांना आवडत होती. अर्जुनशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचं सतत कोणा ना कोणाशी तरी नाव जोडलं जात होतं. अशातच मुंबईतील एका कॉन्सर्टदरम्यान मलायकाला एका तरुण मुलासोबत पाहिलं गेलं. हा मुलगा आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता त्याच मुलासोबत मलायकाचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
कोण आहे हर्ष मेहता?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये मलायका ही हर्ष मेहता नावाच्या तरुणासोबत सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. मलायका आणि हर्ष हे व्हॅलेंटाइन डे निमित्त परदेशात सुट्ट्यांचा आनंद घालवत होते, अशी चर्चा आहे. त्याहीपेक्षा अधिक चर्चा ही मलायका आणि हर्ष यांच्या वयातील फरकावरून होत आहे. हर्ष हा मलायकापेक्षा 12 किंवा 13 वर्षांनी नाही तर तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. तो सध्या 33 वर्षांचा असून मलायका 52 वर्षांची आहे. हर्ष मेहता हा एक डायमंड मर्चंट असून हर्ष सैंकस मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तो प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
हर्ष आणि मलायका हे इटलीमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करत होते, असं वृत्त फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आलं. व्हायरल फोटोमध्ये दोघं इटलीतील प्रसिद्ध ट्रेवी फाऊंटेन याठिकाणी सेल्फी क्लिक करताना दिसत आहेत. याआधी एअरपोर्टवरही या दोघांना पाहिलं गेलं होतं, मात्र त्यावेळी त्यांनी एकत्र चालणं टाळलं होतं. आधी मलायका एअरपोर्टच्या बाहेर निघाली आणि त्यानंतर पाठोपाठ हर्ष पापाराझींना दिसला होता. मलायका किंवा हर्षने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
मलायका 2018 मध्ये अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. गेल्या वर्षीच या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यापूर्वी तिने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. 2017 मध्ये मलायकाने घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगा आहे.
शहर
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
महाराष्ट्र
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
गुन्हा
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स

























Subscribe to my channel



