Emmanuel Macron India Tour : फ्रान्सचे प्रमुख इमॅन्यूएल मॅक्रॉन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. एआय समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ते भारतात आलेले आहेत. यावेळी मुंबईत असताना द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांना सहकार्य करण्याच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा झाली. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी ही बैठक सकारात्मक ठरल्याची भावना व्यक्त केली. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी भारत आणि युरोपीयन युनियन यांच्यासोबत झालेल्या कराराचे स्वागत केले. तर मोदी यांनी भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध खूप जुने असल्याचे भागिदारीला आणखी दृढ करायला हवे, असे मत व्यक्त केले.
भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना फ्रान्स देश तसेच या देशाचे भारतासोबत असलेले संबंध यावर विस्तृत भाष्य केले. इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचे मुंबईत स्वागत करताना मला आनंद होतोय. त्यांनी एआय समिटसाठी मला फ्रान्समध्ये बोलवलं होतं. फ्रान्समध्ये एक सर्वात मोठे बंदर आहे ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल ठेवले. स्वतंत्र्यवीर सावरकर यांनी उडी घेतली त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य मागील वर्षी मिळाले होते. भारताच्या गेटवेत इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचे आपण स्वागत करतो आहोत. भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत. आपल्या भागिदारीला दृढ करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असे मत यावेळी मोदी यांनी व्यक्त केले.
हे वर्ष दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे
२०२६ हे साल दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाॅईंट आहे. आम्ही युरोपसोबत फ्री ट्रॅड अॅग्रीमेंट केले आहे. व्यापाराला गती देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. इंडिया फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर आमचा भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, अंतराळाच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाणार आहे, असे व्हिजन मोदी यांनी सांगितले.
दहशतवाद संपवण्याचा आमचा प्रयत्न
तसेच, एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नोलाॅजी आणि एरोनाॅटिक्सची उभारणी केली जाईल. इंडिया-फ्रान्स भागीदारी जागतिक पातळीवरची भागिदारी आहे. आम्ही युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो पॅसिफिकमध्ये शांतीचे समर्थन करतो. सोबतच दहशतवाद संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारताच्या संस्कृतीला फ्रान्सममध्ये नेण्यासाठी फ्रान्समध्ये विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची उभारणी केली जाणार आहे. एका नव्या अध्यायाचे शुभारंभ आम्ही करतोय, असेही मोदी यावेळी म्हणाले.
माझा भारतातील चौथा दौरा
तर इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनीदेखील भारत-फ्रान्स यांच्यातील सहकार्य, संबंध यावर भाष्य केले. माझा हा भारतातील चौथा दौरा आहे. मी यावेळी एआय समिटला आलो आहे. भारत-फ्रान्स संबंधांवर आमचा विश्वास आहे. आम्ही द्विपक्षीय संबंधासाठी नवीन उद्देश समोर ठेवले आहेत. स्टार्टअप किंवा एमएसईसाठी नवीन उद्देश असतील.
अनेक क्षेत्रात आपण सोबत काम करतोय
राफेल, सबमरीन असेल, किंवा एच१२५ हेलिकॉप्टर असेल, फायटर जेट इंजिन अशा गोष्टींमध्ये आपण सहकार्याने काम करतो आहोत. तंत्रज्ञान देवाणघेवाण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. अंतराळ यासारख्या तसेच इतरही काही क्षेत्रात आपण सोबत काम करत आहोत, असे मॅक्रॉन भारताला उद्देशून म्हणाले.
युरोपसोबतच्या व्यापार कराराचे आम्ही स्वागत करतो
दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व्हायला हवी. स्टार्टअप, आर ॲंड डी, कंपन्या असेल यावर काम व्हायला हवं. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांचे संबंध ज्या गतीने पुढे जायला हवे होते, तसे गेले नाहीत. परंतु आता द्विपक्षीय संबंधांचा चांगल्या पद्धतीने विस्तार होत आहे. फ्रान्सकडे भारताला आणि विश्वाला देण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. आपले विचार एकसारखे आहेत असं दिसतं. खुल्या व्यापाऱ्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे भारताच्या युरोपसोबत झालेल्या व्यापार कराराचे स्वागत आम्ही करतो, असेही मॅक्रॉन यांनी ठळकपणे सांगितले.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




