उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये झालेल्या अपघाताच्या चौकशीने आता वेग घेतला आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) मार्फत या प्रकरणाचा काटेकोर तपास सुरू आहे. या विमानातील महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानाच्या डिजीटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे. आता याचे नुकसान झाल्याने रेकॉर्डर बनवणाऱ्या कंपनीकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे.
डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाऊनलोड, पण व्हॉईस रेकॉर्डरचे मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना विमानाच्या डिजीटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील माहिती यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात यश आले आहे. यातून विमानाचा वेग, उंची आणि तांत्रिक स्थितीची अचूक माहिती मिळणार आहे. मात्र, कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) बाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघाताच्या वेळी निर्माण झालेल्या उच्च तापमानामुळे या रेकॉर्डरचे गंभीर नुकसान झाले आहे. त्यातील वैमानिकांचे शेवटच्या क्षणाचे संभाषण मिळवणे कठीण झाले आहे.
परदेशातील तज्ज्ञांची घेतली जाणार मदत
CVR मधील महत्त्वपूर्ण संवाद रिकव्हर करण्यासाठी आता हा रेकॉर्डर बनवणाऱ्या मूळ कंपनीची तांत्रिक मदत घेतली जात आहे. हा रेकॉर्डर दुरुस्तीसाठी आणि त्यातील डेटा मिळवण्यासाठी परदेशातील तज्ज्ञांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे या संवादातून अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बिघाड स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
DGCA कडून सुरक्षा यंत्रणेची कसून चौकशी
तर दुसरीकडे, नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) संबंधित VSR कंपनीच्या सुरक्षा प्रणालीची आणि कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू केली आहे. विमान उड्डाणापूर्वी सर्व सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि विमानाची देखभाल योग्य प्रकारे केली होती का, याची पडताळणी केली जात आहे. आता याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ही तपास प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चौकशीचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे आवाहन नागरी उड्डाण मंत्रालयाने केले आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




