काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर अर्शदीपसिंहने तिलक वर्माच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवल्याबाबतची एक पोस्ट पाहिली. तिलकने ती गोष्ट सहजपणे टाळली आणि सोशल मीडियावरही त्याकडे सामान्य पद्धतीनेच पाहिले गेले. पण हीच खरी समस्या आहे. आपण अशा गोष्टींना सामान्य मानतो. कारण त्याबाबत आपण पुरेसे संवेदनशील नाही. समस्या फक्त अर्शदीपपुरती मर्यादित नाही. ही भारतीय समाजाची समस्या आहे आणि आपण सगळ्यांनीच ‘यात एवढे काय मोठे आहे’ असे म्हणत ती स्वीकारली आहे. धनराज पिल्ले यांचे उदाहरण घ्या. पिल्ले जेव्हा चर्चेत आले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिभेने सगळ्यांना थक्क केले होते. त्यांना रोखणे अशक्य वाटत होते. पण हॉकी सामन्यांमध्ये त्यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी करणारे शब्द सतत ऐकू येत होते. स्वतः पिल्ले यांनी मला ही घटना सांगितली होती. तेव्हाही त्यांना त्यात काही असामान्य वाटले नव्हते. उलट ते सामान्यच मानले गेले. कारण आपण असेच बोलतो, मग त्यात एवढे मोठे काय आहे? यामध्ये कोलकात्यात खेळून करिअर घडवणाऱ्या नायजेरियन फुटबॉलपटूंचाही मुद्दा जोडता येईल. त्यांच्यापैकी काही आजही खूप लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे थांबवले नाही. चीमा ओकोरी याचे उदाहरण आहेत. ते भारतात खेळलेले सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. पण त्यांनाही ‘काळा चित्ता’ असे म्हटले जात होते. हे सर्व इतके सामान्य झाले आहे की अशा शब्दांच्या वापरात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कदाचित अर्शदीप सिंहला मर्यादा कुठे आखायची हे समजले नसेल. त्याच्यासाठी हे सर्व फक्त विनोद आणि हलकीफुलकी चेष्टा असू शकते. अगदी तिलक वर्मालाही कदाचित यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजले नसेल, म्हणून त्याने ते प्रकरण तिथेच सोडून दिले. पण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला अधिक शिक्षण आणि संवेदनशीलतेची गरज आहे आणि हे जितक्या लवकर होईल तितके भारतासाठी चांगले ठरेल. आजही आपण कोलकात्यात एखादा सप्ताहांताचा सामना पाहायला गेलो. व एखादा आफ्रिकन खेळाडू खेळत असेल तर जवळपास निश्चित आहे की एखादा प्रेक्षक त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करेल. अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी आहे की त्याने लगेच ही बाब रेफरीच्या लक्षात आणून द्यावी. पण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचेही कर्तव्य आहे की अशा व्यक्तीला थांबवावे आणि समज द्यावी. हे एक सामूहिक अभियान असायला हवे, जे फक्त अधिकारी आणि प्रशासकांवर सोडून चालणार नाही. आपल्याकडे अशा लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक त्वचेच्या रंगावरून अपमान करणे हा आपला विशेषाधिकार समजतात. शतकानुशतके आपल्याला या विषाणूवर कोणतीही लस सापडली नाही, पण आता ती विकसित करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंनीही या वाईट प्रवृत्तीविरोधात एकजूट दाखवून केवळ प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, हा निर्धार प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वर्णद्वेषी टिप्पण्यांचे बळी ठरलेले पण बोलणे टाळत राहिले तेही या वाईट प्रवृत्तीला वाढवण्याइतकेच दोषी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की मानवी सन्मानापुढे खेळाची कोणतीही किंमत नाही आणि समाजाप्रती त्यांचीही जबाबदारी आहे.आगामी काळात बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात- जिथे खेळाडूंवर सतत चाहते आणि इतर लोकांची नजर असते- त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. पूर्वी अशा गोष्टी बोलल्या जात असल्या तरी त्या सार्वजनिक होत नव्हत्या. कारण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर येत नव्हती. पण आता एक्स आणि इन्स्टाग्रामवरच संपूर्ण आयुष्य जगले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणारा ओरिएंटेशन कोर्स उपयुक्त ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात खेळाडूंनी पूर्वीपेक्षा अधिक सजग राहण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




