दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘जेन-झी’ म्हणून ओळखल्याजाणाऱ्या तरुणांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्रप्रधान यांचा राजीनामा तर झालाच, पण पंतप्रधानांनाहेदेखील जाणवले की या पिढीशी जोडले जायचे असेलतर इन्स्टाग्रामवर यावे लागेल. त्यांनी सलग तीन दिवसइन्स्टाग्रामवर व्हिडिओ जारी केले आणि आपल्यामंत्र्यांनाही सांगितले की, त्यांनी इन्स्टाग्रामवर यावे. हीचांगली गोष्ट आहे की, पंतप्रधानांचे बदलत्या माध्यमांवरइतके खोल लक्ष आहे आणि त्यानुसार स्वतःला जुळवूनघेण्याची क्षमताही आहे. नवीन पिढी आता व्हॉट्सॲपच्या काळातून बाहेर पडूनइन्स्टाग्राम काळात दाखल झाली आहे. या दोन्हीकालखंडांत एक गुणात्मक फरक आहे. व्हॉट्सॲपवर ज्या पिढ्या सक्रिय आहेत त्या एका खोट्या इतिहासाचे ओझे घेऊन वावरत आहेत, कुटुंबांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स, राजकीय पक्षांच्या आयटी सेलद्वारे प्रसारित केलेले संदेश आणि व्हिडिओ. हे सर्व पाहिले तर त्या सर्वांमध्ये अतिशय तीव्र अल्पसंख्याक विरोधी मानसिकता, वरवरची धार्मिकताआणि अमूर्त सामाजिक चिंता पाहायला मिळतात. पण इन्स्टाग्राम पिढी यापेक्षा वेगळी आहे. तीभूतकाळाच्या निरर्थक ओझ्यातून मुक्त आहे. तीनाचते-गाते, मीम्स बनवते, मार खाते तेव्हा रडते आणिमग जिद्दीने उभी राहते. तिच्यात जुन्या पिढ्यांसारखाअसुरक्षिततेचा भाव नाही आणि त्याऐवजी एक खोल वबिनधास्त स्वरूपाचा आत्मविश्वास आहे. ती आपलेकार्यालय, आपले जग स्वतःच्या खांद्यावर लॅपटॉपच्यास्वरूपात घेऊन फिरते. कॉफी हाऊसपासून तेजंतर-मंतरपर्यंत आपले काम अतिशय काळजीपूर्वकआणि झटपट उरकत असते. दिल्लीच्या जंतर-मंतरवर या शिस्तप्रिय तरुणांना पाहणेहा एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव होता. ते जागा स्वच्छकरण्यासाठी झाडू मारत होते, कचरा उचलत होते,स्वतःच्या पैशाने खाण्या-पिण्याची वस्तू आणून वाटत होतेआणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना हाताच्या पंख्याने वाराहीघालत होते, जेणेकरून उष्णतेपासून सुटका मिळो किंवा नमिळो, पण प्रत्येकाला असे वाटावे की त्यांची काळजीघेतली जात आहे. बऱ्याच लोकांना या ‘जेन-झी’च्याभाषेबद्दल आक्षेप आहे, जो एका पातळीपर्यंत योग्यहीआहे. आपली पिढी ज्या संस्कारांमध्ये वाढली आहे, तिथेशिव्या ऐकून आपले कान लाल होतात. पण या मुलांच्याजीवनात आपल्या काळातील नैतिकता नाही.बालपणापासून त्यांच्या हाती स्मार्टफोन आहे. किशोरवयीनहोईपर्यंत या फोनवर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शनअसते, जिथे जगातील सर्व प्रकारची लैंगिक विकृतीअसलेली सामग्री मिळते. शिव्यादेखील मिळतात. त्यामुळेशिव्या देण्याबाबत त्यांच्या मनात आपल्या तुलनेत अधिकमोकळेपणा आहे. त्यांना दिखाऊ सभ्यतेची पर्वा नाही. पुन्हा असेही नाही की या पिढीची सगळीच्या सगळी मुलेयाच शिवीगाळ करणाऱ्या भाषेत बोलतात. सत्य तर हेआहे की जंतर-मंतरवर लागणाऱ्या शंभरपैकी नव्याण्णवघोषणा आणि दिसणारे पोस्टर्स अतिशय सुजाण आणिकल्पकतेने भरलेले पाहायला मिळाले आहेत. पण जो एकटक्का किंवा त्याहून कमी असलेला उपेक्षित तमाशा आहेत्याचा प्रचार अशा प्रकारे करण्यात आला आहे की हीच‘जेन-झी’ची भाषा आहे. व्हॉट्सॲप व इन्स्टाग्राम युगातील सर्वात मोठा फरक हाआहे की, व्हॉट्सॲपवर जर द्वेषाची दुकाने चालत होती तरइन्स्टाग्रामवर प्रेमाची गाणी वाजत आहेत. या इन्स्टाग्रामपिढीने हिंदू-मुसलमानवाला नॅरेटिव्ह पूर्णपणे नाकारलाआहे. जंतर-मंतरवरून आलेल्या रील्स पाहिल्या तर हीगोष्ट अतिशय उघडपणे समोर येते की, या पिढीलाजातीयवादाच्या खेळाशी काहीही देणेघेणे नाही. या दृष्टीनेपाहिले तर हे आंदोलन पेपर लीकच्या विरोधात आणिधर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षा आपल्या काळाचाआणि समाजाचा खोल असंतोष व्यक्त करताना दिसले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) व्हॉट्सॲप काळात ज्या प्रतिमा तयारझाल्या होत्या, त्या इन्स्टाग्राम काळातचक्काचूर होताना दिसत आहे. हेकाहींसाठी सुटकेचा तर काहींसाठी चिंतेचाविषय आहे. नवी पिढी व्हॉट्सॲपमध्ूनबाहेर पडून इन्स्टाग्राम काळात दाखलझाली. दोन्हीमध्ये गुणात्मक फरक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



