सध्याच्या जमान्यात प्रेम मोठं की पैसा? तर अनेक जण पैसा म्हणतील. पण आजही असे प्रेम करणारे आहेत, ज्यांच्यासाठी पैशापेक्षा प्रेम जास्त महत्वाचं आहे. प्रेमासाठी ते काहीही करायला तयार असतात. पैसा सुद्धा त्यांच्यासमोर कवडीमोल असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे प्रेयसीने विवाहित प्रियकराचं प्रेम मिळवण्यासाठी आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. हा सर्व घटनाक्रम 90 च्या दशकातील ‘जुदाई’ चित्रपटाची आठवण करुन देतो. फरक इतकाच आहे की, ही स्टोरी पडद्यावरची नसून खऱ्या आयुष्यातली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ फॅमिली कोर्टातील हे प्रकरण आहे.
भोपाळमध्ये एक 42 वर्षीय सरकारी कर्मचारी त्याच्याच विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या प्रेमात पडला. ती वयाने 10 वर्षाने मोठी आहे. वेळेबरोबर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रियकराच्या घरात तणाव वाढू लागला. पती-पत्नीमध्ये विवाहबाह्य संबंधांवरुन भांडणं वाढू लागली. याचा परिणाम त्यांच्या 16 आणि 12 वर्षाच्या मुलीच्या मनावर होऊ लागला. घरातलं वातावरण इतकं बिघडलं की, मोठ्या मुलीने फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले.
घटस्फोटासाठी तो तयार झाला
न्यायालयात काउंसलिंगची सत्र सुरु झाली. अनेक बैठकांनंतर पतीने स्पष्ट केलं की, त्याला त्याची ऑफिसमधील सहकारी आणि प्रेयसी सोबत रहायचं आहे. घटस्फोटासाठी तो तयार झाला. घरातला तणाव आता असहनीय झालाय हे सुद्धा त्याने मान्य केलं. त्याचं मुलींवर भरपूर प्रेम आहे. जवळपास पाच वर्ष चाललेल्या या वादात अखेर तडजोडीचा मार्ग निघाला.
पतीच्या प्रेयसीने लगेच हा प्रस्ताव स्वीकारला
पत्नीने तिच्या आणि मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. तिने पतीकडे डुप्लेक्स घर आणि 27 लाख रुपये रोख रक्कमेची मागणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे पतीच्या प्रेयसीने लगेच हा प्रस्ताव स्वीकारला. घर आणि रोख रक्कम मिळून दीड कोटी रुपये द्यायला ती तयार झाली. प्रियकराच्या कुटुंबावर कुठलही संकट येऊ नये अशी तिची इच्छा होती. आता दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने वेगळे झालेत.
हे असं पहिलं प्रकरण असावं
1997 साली आलेला जुदाई चित्रपट सुद्धा असाच होता. पती, पत्नी आणि वो मध्ये पैशाच्या बदल्यात नात्याचा सौदा झाला होता. स्वार्थ हे त्यात मुख्य कारण होतं. भोपाळच्या या प्रकरणात परस्पर सहमती आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याला आधार बनवण्यात आलं आहे. भोपाळमधील हे असं पहिलं प्रकरण असावं, जिथे प्रेयसीने प्रियकराला मिळवण्यासाठी इतकी मोठी रक्कम चुकवली असेल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



