पुणे : शिंदे गटाला दसरा मेळावा घ्यायचा असल्यास त्यांनी दुसर्‍या मैदानांवर घ्यावा : जयंत पाटील

पुण्यात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आले होते. त्यावेळी दसरा मेळाव्यावरून शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद सुरू झाला आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले की,शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत होते.तो त्यांचा हक्क आहे.अस मला वाटतं. तसेच त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेल असेल आणि दसरा मेळावा घेण्याची इच्छा असल्यास बंदी करण्याची गरज नाही.मुंबईत त्यांना वेगळ मैदान द्याव. एकाच मैदानावर दोघांनी क्लेम करण,पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा परंपरागत क्लेम आहे.मात्र शिवसेनाचा परंपरागत क्लेम डावलण योग्य नाही आणि शिंदे गटाला दसरा मेळावा घ्यायचा असल्यास त्यांनी दुसर्‍या मैदानांवर घ्यावा अशी भूमिका सध्याच्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या वादावर मांडल्याने आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

ईडीपासून पळणार्‍या व्यक्तीला स्वतः ईडी क्लोजर पर्यत आणून सोडेन
आमदार प्रताप सरनाईक यांच्या बाबत ईडीकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.त्यावर जयंत पाटील म्हणाले की,एके काळी ईडी प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागे लागली होती. पण आता त्याच ईडीने सर्व चौकशी केलेली दिसत आहे. प्रताप सरनाईक यांच्या आर्थिक व्यवहारात कोणताही दोष नाही.एवढ्या निष्कर्षापर्यत ईडी आली आहे.हे सगळं परिवर्तन कधी झाल आहे. हे देशाला आणि महाराष्ट्राला समजू शकते. चार महिन्यापूर्वी ईडीपासून पळणार्‍या व्यक्तीला स्वतः ईडी क्लोजर पर्यत आणून सोडल आहे.यातून एकच स्पष्ट होते.तुम्ही राजकीय विचार बदले की ईडी किंवा अन्य एजन्सी तुमच्या बद्दल ठप्प होते.अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्पाबाबत जयंत पाटील यांना विचारल असता ते म्हणाले की, वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास एकनाथ शिंदे सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, निर्णय न घेतल्यामुळे किंवा दिल्लीच्या दबावामुळे शेजारील गुजरात राज्यात तो प्रकल्प गेला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या तीन चार लाख सुशिक्षित तरुणांच्या तोंडाला पान पुसण्याच काम या सरकारने केले आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

‘हा’ पण एक वेगळा योगायोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल देशात चित्ते आणले गेले आहे.त्यावर ते म्हणाले की,माझ्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,तसेच आपल्या देशात ७० वर्षात चित्ते नव्हते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशात चित्ते आले आहेत.हा पण एक वेगळा योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच नेतृत्व,आमदार खंबीर
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघ टार्गेट केले जात आहे.त्यावर ते म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघ कोणीही टार्गेट केले.तर फार काही फरक पडत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच नेतृत्व,आमदार खंबीर आहेत.तसेच ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली.ती पद्धत महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेली नाही.

स्वतःच्या पक्षाच काम करीत आहे.याबद्दल आम्हाला आनंद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.त्यावर ते म्हणाले की,महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत.चांगली गोष्ट असून सर्व ठिकाणी जाऊन ते त्यांचा स्वतः चा पक्ष वाढवित आहे.अशी आमची अपेक्षा आहे. दुसर्‍या पक्षाच काम न करता.स्वतःच्या पक्षाच काम करीत आहे.याबद्दल आम्हाला आनंद असल्याच सांगत राज ठाकरे यांना जयंत पाटील यांनी टोला लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply