
पुण्याच्या तळेगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तळेगावात एकच खळबळ उडाली आहे. प्रणव उर्फ जय मांडेकर वय- १९ वर्षे अस हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तो इंद्रायणी कॉलेजमध्ये एफ.वाय. बी.कॉमचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मयत प्रणव हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता परंतु, सोबत असलेल्या तरुणाची एका सोबत फोनवर बाचाबाची झाली. त्या तरुणाला मारण्यासाठी २० ते २५ जणांचे टोळके तिथे आले व त्यांच्याकडून प्रणवला त्यांचा साथीदार समजून त्याची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास आई स्वाती यांनी मुलगा प्रणवला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाले आहे निघतच आहे असे म्हणून फोन ठेवला. मात्र, दीड तास उलटला तरी मुलगा का आला नाही म्हणून पुन्हा आईने फोन केला आणि तो फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि प्रणवचा खून झाल्याचे आईला सांगितले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर समजले की, प्रणवच्या सोबत असलेल्या विशालचे मंगेश सोबत फोनवर बाचाबाची झाली होती यातूनच हा प्रकार घडल्याचा त्यांना सांगण्यात आले.
प्रणवसह नऊ जण इदगाह मैदान कडोलकर कॉलनी येथे गप्पा मारत बसले होते. तेव्हा, मंगेशसह एकूण २० ते २५ जणांचे टोळके सहा ते सात दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्याकडे कॊयता , पालघन, लोखंडी रॉड होते. मंगेश प्रणव सोबत असलेल्या विशालला म्हणाला की तुला खूप मस्ती आली आहे आता तुझी मस्तीच उतरवतो असे म्हंटल्यावर सर्व जण घाबरले. प्रणवसह सर्व जण मिळेल त्या दिशेने पळायला लागले. प्रणव धावत असताना काही अंतरावर ठेच लागून खाली पडला. तेव्हा, त्याला गाठून तो वर्माचा साथीदार आहे अस समजून त्याला कोयता, लोखंडी रॉड ने वार करून ठार मारण्यात आले. खून केल्यानंतर टोळक्याने हवेत कोयता फिरवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. घाबरून तेथील दुकानदारांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
शहर
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
गुन्हा
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
राजकीय
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
इतर
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!























Subscribe to my channel



