Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकार किंवा अभिनेत्रीमुळे तो चित्रपट प्रचंड चर्चेत येतो. पण 38 वर्षांपूर्वी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ना कलाकार, ना चित्रपटाची कथा चर्चेत आली. मात्र, हा चित्रपट फक्त एका मगरमच्छमुळे प्रचंड गाजला.
1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. रेखा यांनी जवळपास एकहाती हा चित्रपट गाजवला असे म्हटले जाते. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत कबीर बेदी, सोनू वालिया आणि कादर खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते.
कथानकात मगरमच्छाचा थरार
चित्रपटाची कथा आरती (रेखा) या श्रीमंत घराण्यातील विधवेभोवती फिरते. तिच्या पतीचा कार अपघातात मृत्यू होतो तर वडिलांचीही हत्या होते. दोन मुलं आणि पाळीव कुत्र्यांसह ती एकटीच आयुष्याशी दोन हात करत असते.
तिच्या वडिलांचा मित्र हिरालाल (कादर खान) तिच्या आयुष्यात ‘फादर फिगर’ बनून प्रवेश करतो. मात्र त्यामागे वेगळेच कारस्थान असते. तो आपल्या पुतण्याला संजयला (कबीर बेदी) आरतीच्या आयुष्यात आणतो जेणेकरून तिच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल. आरतीची मैत्रीण नंदिनी (सोनू वालिया)ही या कटात सामील असते.
सर्वजण मिळून आरतीला संजयशी लग्न करण्यास प्रवृत्त करतात. लग्नानंतर मात्र खरी नाट्यमय वळण सुरू होते. संजय आणि नंदिनी आरतीला सहलीच्या बहाण्याने घेऊन जातात आणि मगरमच्छांनी भरलेल्या पाण्यात ढकलून देतात.
मृत्यूपासून सुटका आणि बदला
संजय आणि नंदिनीला वाटते की आरतीचा मृत्यू झाला आहे. मात्र मगरमच्छांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही ती बचावते. प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा बदलतो आणि ती नव्या ओळखीने परतते.
यानंतर सुरू होते सूडनाट्य. आरती एक-एक करून संजय, नंदिनी आणि हिरालाल यांच्या आयुष्याचा विध्वंस करते. शेवटी ती आपल्या शत्रूंनाही तसाच धडा शिकवते जसा तिच्यासोबत झाला होता. त्यांना देखील मगरमच्छांच्या तावडीत सोपवून देते.
‘खून भरी मांग’मध्ये मगरमच्छाचे सीन काही मिनिटांचे असले तरी त्यांनी संपूर्ण चित्रपटाला वेगळी ओळख दिली. सुरुवातीपासून क्लायमॅक्सपर्यंत मगरमच्छ हा कथानकाचा महत्त्वाचा भाग राहिला. थरार, भावनिक संघर्ष आणि सूडाची कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




