ठाण्यातील उत्तर सभेसाठी राज ठाकरे रवाना

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्यावेळात ठाण्यात उत्तर सभा होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. ठाण्यातील उत्तर सभेसाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मनसेकडून (MNS) सभेपूर्वी तीन टीझर रीलीज करण्यात आले होते. 9 एप्रिल रोजी मनसेकडून कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी ''वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे'' असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांची तोफ कुणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आजच्या ठाण्यातील सभेत या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे उत्तरसभा होणार आहे. यासभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या सभेसाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, डोंबिवली मनसे कार्यलयातून वाजत गाजत मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी डोंबिवलीहून ठाण्याला रवाना झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply