काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

image

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांमध्ये काळ बराच वेळ चर्चा झाली असून कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचे आभार ही मानले अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या भेटीने ठाकरे गटात ही अस्वस्थता दिसून आली. यानंतर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कच्या सुशोभीकरण कामाचा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी काका पुतणे हे एकमेकांशी बोलत ही होते. तसेच छत्रपती शिवाजी पार्कवरील मैदानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दोघांनी अभिवादन ही केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *