चमकदार क्रेडिट कार्ड व किमान सरासरी शिल्लक रकमेचा नियम बँक इंडस्ट्रीसाठी कमाईचा मोठा आहे. प्रीमियम कार्ड एअरपोर्ट लाउंजपर्यंत पोहोच, कॅशबॅक व रिवॉर्ड पॉइंट्सचे आमिष दाखवतात. दुसरीकडे, जर बचत खात्यात किमान शिल्लक नसेल, तर बँक दंड आकारते. आपण सुविधांच्या मागे धावतो व बँका वार्षिक शुल्क, व्याज, दंड व सर्व्हिस चार्जमधून कमाई करतात. अर्थ मंत्रालयानुसार, गेल्या 5 आर्थिक वर्षांत बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून 27,973 कोटी रुपयांचा मोठा दंड वसूल केला. एचडीएफसीला या वसुलीतून 5,670 कोटींची कमाई झाली. ॲक्सिस आणि बँक ऑफ बडोदासाठी हा आकडा अनुक्रमे 3,787 कोटी आणि 2,028 कोटी राहिला. सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्स साइन-अप बोनस आणि कार्ड्सचा प्रचार करून असे वातावरण तयार करतात, जणू काही ही कार्ड्स तुम्हाला त्यांच्यासारखीच एक शानदार आणि हाय-फाय लाइफस्टाइल देतील. ते कार्डवरील खर्चाची मर्यादा पूर्ण करण्यासाठी ॲडव्हान्स इन्शुरन्स भरणे, जिम मेंबरशिप घेणे किंवा गाडी दुरुस्त करणे यासारखे सल्ले देतात. पण या सर्वांसाठीही खिशातून खरी रोकडच जाते. ट्रॅव्हल पर्क्स म्हणजेच प्रवासात सवलत देणारी क्रेडिट कार्ड्स बँका व एअरलाइन्ससाठी फायदेशीर असतात, पण मध्यमवर्गासाठी त्याचा विशेष फायदा होत नाही. कारण हा वर्ग दर आठवड्यास विमान प्रवास करत नाही. एकही आठवडा असा जात नाही जेव्हा आपल्यासारख्या लोकांना आकर्षक क्रेडिट कार्डचे आमिष दाखवले जात नाही. मॉल किंवा एखाद्या दुकानाच्या कॅश काउंटरवर लोक अनेकदा अनेक क्रेडिट कार्ड््स दाखवत म्हणतात, ‘हे चालले नाही, तर हे घ्या.' विडंबना ही की कॅशिअरसमोर स्वतःला जितके श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच शांतपणे आपल्या खिशातून पैसा बाहेर जातो. संपत्ती क्वचितच प्रीमियम कार्ड जमा केल्याने किंवा टाळता येण्याजोगे शुल्क भरल्याने बनते. ती अनावश्यक शुल्क आणि खर्चापासून वाचून आणि समजूतदारपणे कर्ज घेतल्याने बनते. चमकदार ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड अनेकदा आपल्यासोबत मोठे ओझे घेऊन येतात. मॅनेजमेंट टिप : खरी धनसंपत्ती हे प्रीमियम कार्ड््सना जमा केल्याने बनत नाही तर फालतूचे शुल्क, दंड आणि विनाकारण होणाऱ्या खर्चापासून वाचल्याने बनते. पैशांचा वापर स्वतःसाठी करा, बँकांचा फायदा करून देण्यासाठी नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




