माझ्याही काही लहानसहान सवयी आहेत. एक म्हणजे ‘रिटर स्पोर्ट हेझलनट चॉकलेट’. विश्वास ठेवा, 100 ग्रॅमचे हे पॅकेट मी लंच आणि डिनरनंतर चार भागांत विभागून अवघ्या दोन दिवसांत संपवत असे. प्रत्येक विदेशवारीवर मी हे भरपूर प्रमाणात विकत घेतो. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला माझी ही कमजोरी माहीत आहे, मला काही सांगण्याची गरज पडत नाही. पण ही छोटीशी सवय हळूहळू आरोग्याची समस्या बनली आणि मला डॉक्टरांकडे जावे लागले. आजही माझ्या फ्रिजमध्ये ‘रिटर स्पोर्ट’ आहेत, पण त्या संपत नाहीत. मी या सवयीतून मुक्त झालो आहे. नुकतेच मी कॅथरीन ग्रे यांचे ‘लिटल ॲडिक्शन्स : फ्रीडम फ्रॉम अवर टाइनी बट मायटी कंपल्शन्स’ हे पुस्तक वाचले. त्या म्हणतात की, बहुतेक लोक मानतात की स्मोकिंग, वेपिंग, सट्टेबाजी आणि पोर्न पाहणे हेच व्यसन आहे. पण काही कमी नुकसानकारक गोष्टीही आहेत, ज्या जीवनाची गुणवत्ता खराब करू शकतात. उदाहरणार्थ, टीव्ही पाहणे, बोअर झाल्यावर शॉपिंग करणे, जंक फूड खाणे आणि आइस्क्रीमची ओढ (जी मलाही आहे, पण मी दुसरी कोणतीही मिठाई खात नाही). या गोष्टी लाइफस्टाइलवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. त्या एका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसारखी या सवयी वाढण्याची प्रक्रिया सांगतात. 1. मजा, 2. मजा + समस्या, 3. समस्या + मजा, 4. समस्या. जेव्हा कोणतीही सवय ठरलेल्या वापरापेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा तिथेच त्याचे व्यसनात रूपांतर होते. त्यांनी अशा अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे, पण मी अशा तीन सवयींबद्दल सांगत आहे, ज्या बहुतेक लोकांमध्ये असतात. बिंज वॉचिंग : कॉर्नेल विद्यापीठाच्या एका अभ्यासात लोकांना ‘बॉटमलेस बाऊल’मध्ये सूप देण्यात आले. हा असा बाऊल होता, ज्यात सूप आपोआप भरले जायचे. तेव्हा लोकांनी सामान्यच्या तुलनेत 73% जास्त सूप प्यायले. याचप्रमाणे टीव्ही कंटेंट प्रोड्युसर सीझनचे पूर्ण एपिसोड एकदाच देतात व आपण एकाच रात्रीत हे बिंज वॉच करतो. हे कसे ठीक करायचे? हे ठरवा की आयुष्यातील किती वर्षे तुम्हाला टीव्ही पाहायचा आहे? 365 दिवस रोज 54 मिनिटे पाहणे म्हणजे 19,710 मिनिटे- म्हणजेच एका वर्षात 329 तास. खूप जास्त टीव्ही पाहण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही त्या लोकांपैकी आहात, ज्यांना तत्काळ समाधान हवे असते. त्याऐवजी धीमे डोपामाइन देणाऱ्या गोष्टी शोधा, जसे- वाचणे, स्वयंपाक करणे, लोकांना भेटणे किंवा व्यायाम.
2. शॉपिंग : मी एम. वेंकटरमन यांना ओळखतो, जे डीएनए वृत्तपत्रात चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. ते अस्वस्थ झाले की शॉपिंगला निघून जात. तेव्हा मला माहीत नव्हते की हेदेखील व्यसन असू शकते. ग्रे सांगतात की लोक गरजेपेक्षा जास्त शॉपिंग का करतात? त्या म्हणतात की, एका अभ्यासानुसार याचे कारण यापैकी एक असते- सुखाचा शोध, वेदनेपासून वाचण्याचा प्रयत्न, सजावटीद्वारे प्रभाव दाखवणे, सौंदर्याद्वारे रोमँटिक स्वीकारार्हता मिळवणे व संसाधने जमा करणे. आता हे कसे थांबवायचे? मेंदूचा एक भाग ‘इन्सुला’ आपल्याला शॉपिंगपासून रोखतो. हा भाग नकारात्मक उत्तेजना, तिरस्कार व नुकसानीपासून वाचण्याची भावना निर्माण करतो. जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा हा भाग सक्रिय होत नाही. पण कॅश पेमेंट करताना ‘पेन ऑफ पेमेंट’ ॲक्टिव्हेट होते, जे आपल्याला कमी खरेदीसाठी प्रेरित करते.
3. लोकांना खुश करणे : अनेक लोक दुसऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भारी वजन उचलण्यासारखे काम करतात. रविवारी मी व्यक्तिगतरीत्या हे अनुभवले, जेव्हा मी त्या रुग्णाला कुशीवर वळवले, ज्याला पाहण्यासाठी मी गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात जात होतो. माझ्या पाठीत तीव्र कळ आली. कोणताही संघर्ष टाळण्यासाठी दुसऱ्यांच्या मूडवर गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवणे याला इंग्रजीत ‘फॉन’ म्हणतात. हे त्या लोकांमध्ये जास्त दिसते, ज्यांचे बालपण संकटांत गेले आहे. हे ठीक करण्यासाठी सीमा ठरवा. जर कुणी रागात किंवा अस्वस्थ दिसत असेल तर विचार करा की ‘त्यांना तसेच राहू द्या’ आणि तिथून बाजूला व्हा. जेव्हा ‘हो’ म्हणायचे असेल, तेव्हा ‘नाही’ म्हणणे हादेखील एक मार्ग आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

7 October 2026
7 October 2026
बेंगळुरूमध्ये खड्डा चक्क ‘बोगद्या’सारखा; माती-मलबा टाकून बुजवला
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




