या दोन्हींच्या कथांची सुरुवात वेगवेगळी आहे, मात्र शेवट असाधारण आहे. त्यांच्या कथा अमेरिकेतील फ्लोरिडा आणि भारतातील लखनऊमध्ये हजारो किलोमीटरच्या अंतरावर सुरू झाल्या. नॅथन थॉमसची कथा फ्लोरिडातून तर दीप्ती कनोजियाची लखनऊमधील एका खोलीच्या घरातून सुरू झाली. नॅथन गणितीय समीकरणांच्या मध्ये लहानाचा मोठा झाला, तर दीप्ती अनिश्चिततेत मोठी झाली. नॅथन 19 व्या वाढदिवसापूर्वीच जगातील सर्वात कमी वयाचा पुरुष प्रोफेसर बनला, तर दीप्तीने 14 व्या वाढदिवसापूर्वीच आपल्या पालकांना गमावले. असे असूनही तिने सिंगापूरमध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवली. नॅथन इंजिनिअर्सच्या कुटुंबातून येतो. त्याच्या आईमध्ये अवघड प्रश्नही सहजपणे समजावून सांगण्याची अद्भुत क्षमता आहे. म्हणूनच नॅथन अशा मुलांपैकी एक होता, जो त्या गणितीय प्रश्नांचाही आनंद घ्यायचा, ज्यांना पाहून मोठी माणसेही घाबरायची. जेव्हा बहुतांश मुले मिडल स्कूलमध्ये प्रवेश घेतात तेव्हा नॅथनने ड्युअल एनरोलमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून अवघ्या 10 व्या वर्षीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ज्या वयात बहुतांश टीनएजर्स हे ठरवत असतात की त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे तेव्हा नॅथनने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ऑनर्समध्ये आपली बॅचलर आणि मास्टर्स पदवी पूर्ण केली. अलीकडेच 18 वर्षे 346 दिवस वयाचा असताना त्याने मियामी डेड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शिक्षकाचे पद स्वीकारले आणि तो जगातील सर्वात कमी वयाचा प्राध्यापक बनला. त्याने स्कॉटलंडचे गणितज्ञ कॉलिन मॅकलॉरिन यांचा 2008 चा विक्रम मोडला, जे 19 व्या वर्षी प्राध्यापक बनले होते. जेव्हा नॅथनला या विक्रमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने प्रसिद्धी किंवा ओळखीची बात केली नाही, तर तो म्हणाला की त्याला शिकवण्याचा सर्वाधिक आनंद मिळतो. तो म्हणाला, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला एखादी अवघड कॉन्सेप्ट अचानक समजते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ते पाहणे हा त्याचा सर्वात आवडता क्षण असतो. त्याच्यासाठी यशाचे मोजमाप हे नाही की त्याला किती माहिती आहे, तर त्याच्यामुळे दुसरे किती शिकू शकले हे आहे. आता लखनऊकडे वळूया, जिथे एका टीनएजरचे आयुष्य अत्यंत अडचणीत गेले. 13 व्या वर्षी दीप्ती अनाथ झाली. अशी दुर्घटना अनेकांच्या स्वप्नांचा अंत करू शकली असती, पण दीप्तीसाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात ठरली. तिने प्रेरणा गर्ल्स स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण निष्ठेने सुरू ठेवले. एक्स्ट्रा-करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येही सहभाग घेतला आणि हळूहळू आत्मविश्वास परत मिळवला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने शिक्षकांनी सांगितलेल्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवला, ज्यावर स्वतः तिचाही विश्वास नव्हता. ते म्हणजे परिस्थिती तिचे भविष्य ठरवत नाही. गेल्या वर्षी तिने युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस मूव्हमेंटच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जगातील सर्वात स्पर्धात्मक शैक्षणिक शिष्यवृत्तीपैकी एकासाठी अर्ज केला. निवड प्रक्रियेत अकॅडमिक एक्सलन्स, नेतृत्वक्षमता, विचारांची प्रगल्भता, समाजसेवा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता यांसारख्या गुणांची पारख केली गेली. अनेक महिन्यांनंतर उत्तर आले. दीप्तीची निवड पूर्ण शिष्यवृत्तीवर सिंगापूरच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेज साऊथ ईस्ट आशियामध्ये इंटरनॅशनल बॅकलॉरिएट डिप्लोमा प्रोग्रामच्या शिक्षणासाठी झाली. पालक तुमच्याकडून जगातील सर्वात कमी वयाचे प्राध्यापक बनण्याची किंवा आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवण्याची अपेक्षा ठेवत नाहीत. विक्रम तर दररोज मोडले जातात आणि मोजकेच लोक शिष्यवृत्तीही मिळवतात. मी तर यापेक्षाही खूप मौल्यवान गोष्ट तुमच्यासाठी इच्छितो- शिकण्यावर आयुष्यभर प्रेम करत राहा. तुम्ही जिज्ञासू राहाल, न घाबरता प्रश्न विचाराल, इतरांपेक्षा जास्त वाचाल, जेव्हा कोणी पाहत नसेल तेव्हाही सराव कराल आणि निराशेनंतरही पुढे जात राहाल तर यश शेवटी तुमच्या मागे येईल. फंडा असा की, स्वप्ने तुमचे वय किंवा पत्ता विचारत नाहीत. मोठी स्वप्ने पाहा, पूर्ण जिद्दीने त्यांचा पाठलाग करा आणि मग पाहा की तुम्ही कुठे पोहोचता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




