ती तलावाच्या काठावर बसून विचारांत हरवली होती. अचानक पाण्यात तिला चार घोडेस्वारांच्या सावल्या दिसतात. ती क्षणार्धात वळते आणि ओरडते, “चल धन्नो!” घोडीही तत्काळ तिच्याकडे पाहते. जणू आपल्या मालकिणीवर आलेले संकट तिला समजले होते. बसंती टांग्यावर चढण्याआधीच धन्नो वेगाने धावू लागते. टांग्यावर बसताच बसंती म्हणते, “पळ धन्नो, आज तुझ्या बसंतीच्या अब्रूचा प्रश्न आहे...” 51 वर्षांपूर्वीच्या ‘शोले’ चित्रपटातील हा प्रसंग अनेकांना आठवत असेल. काहींना प्रश्नही पडला असेल की एखादी घोडी धोका कसा ओळखू शकते? मात्र मला या प्रसंगाबद्दल कधीच शंका वाटली नाही. कारण माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या भावना समजून घेतात. आपला ताण कमी करतात. चिंता शांत करतात. काही रुग्णांत जगण्याची इच्छाही निर्माण करतात. अशा अनेक कथा मी वाचल्या होत्या. वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या होत्या. पण हे प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ आली ती माझ्या आईची ‘सीसू’शी झालेली मैत्री पाहिल्यावर. तो पाळीव कुत्रा होता. त्याला आमच्या घरात येण्याची परवानगी होती. सीसूची ओळख करून देण्यापूर्वी एक गोष्ट मान्य करावी लागेल. माझ्या लग्नात मलाही ‘हुंडा’ मिळाला होता. होय, सीसू. हा आमच्या घरी आलेला पाळीव कुत्रा माझ्या पत्नीसोबतच आला होता. लग्नाच्या वेळी तो आठ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, नववधू-वरांपेक्षा आधी तोच गाडीच्या पुढच्या आसनावर बसला होता. सासरी पोहोचल्यावर नवदाम्पत्याचे औक्षण होण्यापूर्वीच तो घरात शिरला. प्रत्येक खोलीत जाऊन त्याने वास घेतला. सर्वकाही पाहिले आणि मग बाहेर येऊन औक्षणासाठी सर्वात पुढे बसला. प्रथम त्याच्या कपाळावर टिळा लावण्यात आला आणि त्यानंतर नवदाम्पत्याला. हे दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. जणू घराची पाहणी करून त्याने मंजुरी दिली होती. माझ्या पत्नीला हे घर सुरक्षित असल्याचा संदेश दिला होता. हळूहळू आमच्या स्वयंपाकघरातील चर्चाही सीसूच्या आवडी-निवडीभोवती फिरू लागल्या. एकदा माझ्या आईने सांगितले की, ‘सीसूला तुपाचा डोसा आवडतो.’ हा सन्मान आम्हाला सहसा हॉटेलमध्येच मिळत असे. मला स्वतःचा वाढदिवसही अनेकदा लक्षात राहत नसे. पण एकदा आईने सीसूच्या वाढदिवसासाठी ३०० रुपये खर्च केल्याचे सांगितले आणि मी थक्क झालो. त्यावर वाद घालण्याचा प्रयत्न केला. पण आईच्या प्रेमळ हट्टापुढे माझे काहीच चालले नाही. आई उपवास करत असे. तेव्हा सीसूही काही खात नसे. तो तिच्यासोबत जवळच्या मंदिरात जाई आणि पूजा पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाट पाहत बसे. किमोथेरपीनंतर आई तीन-चार दिवस रुग्णालयात दाखल असली तरी तिची सर्वात मोठी चिंता सीसूच्या खाण्यापिण्याचीच असे. आम्ही तिला सांगायचो, ‘तो नीट खात नाही.’ तेव्हा ती म्हणायची, ‘सीसूच्या आधी माझा मृत्यू होऊ नये, एवढीच इच्छा आहे.’ कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातही तिच्या मनात जगण्याची उमेद शिल्लक होती. त्यामागे सीसूचे अस्तित्व मोठे कारण होते, असे आम्हाला अनेकदा वाटायचे. एकदा डॉक्टरांनीही सांगितले, ‘त्या औषधांना चांगला प्रतिसाद देत आहेत. कारण त्यांना घरी परतून सीसूला भेटायची ओढ आहे.’ आईची प्रकृती खालावत गेली तसतसा सीसू तिचा कायमचा सोबती बनला. त्याच्यासाठी अन्न नेले, तरी आईने ‘खा रे माझ्या बाळा’ असे सांगितल्याशिवाय तो तोंड लावत नसे. तो सतत तिच्या जवळ असे. जिथे तिच्या पायांना वेदना होत असत, तिथे तो आपला पंजा ठेवून बसायचा. कर्करोगामुळे आईच्या पाठीच्या असह्य वेदना वाढल्या की तो स्वतःही खाणे सोडून द्यायचा. आईच्या निधनाच्या एक वर्ष आधीच सीसूचा मृत्यू झाला. त्यानंतर आई जेव्हा त्याच्याशी संबंधित आठवणी सांगायची, तेव्हा त्या कथा आम्हाला हसवायच्याही आणि डोळ्यात पाणीही आणायच्या. फंडा असा की- माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, असे लोक म्हणतात, तेव्हा त्यासाठी मला कधीही पुराव्याची गरज वाटली नाही. कारण सीसूने आम्हाला हे सत्य खूप आधीच शिकवून ठेवले होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

27 October 2026
27 October 2026
५० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार? ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद!
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा


























Subscribe to my channel




