‘अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना, दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना…।’ हे केवळ 38 वर्षांचा गायक अरिजित सिंहचे गाणे नाही, तर कामाच्या ठिकाणी तरुणांची जीवनशैली बनत चालली आहे. अरिजितने पार्श्वगायन क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा करून पूर्ण उद्योगाला चकित केले. चित्रपटांसाठी गायकीच्या त्याच त्याच तांत्रिक गोष्टींचा कंटाळा आला असून आता स्वतंत्र संगीत आणि सर्जनशील विकासावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे त्याने सांगितले. लोक याला वैयक्तिक निर्णय म्हणू शकतात, तर दुसरीकडे काही लोक स्वतःला सावरण्यासाठी मोठी सुट्टी घेत आहेत. काम सोडण्याचा (क्विटिंग) हा प्रघात 2024 पासून लोकप्रिय झाला. त्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
1. विनोदी कलाकार झाकीर खान (38) याने अलीकडेच आनुवंशिक आरोग्य समस्या आणि थकव्याचा हवाला देत थेट सादरीकरणातून प्रदीर्घ सुट्टी घेण्याची घोषणा केली. ही सुट्टी 2030 पर्यंत चालू शकते. 2. ‘द लॉस्ट’ आणि ‘अँट मॅन’ची अभिनेत्री इव्हँजेलिन लिली (44) हिने कुटुंब, मानवतावादी कार्य आणि लेखनासाठी अनिश्चित काळासाठी अभिनयापासून दूर राहण्याची घोषणा केली. 3. ‘व्हॅम्पायर डायरीज’चा स्टार इयान सोमरहेल्डर (47) याने शेती आणि कुटुंबासाठी हॉलीवूड सोडले. उद्योगाच्या झगमगाटापेक्षा शांत जीवन जास्त आवडते असे त्याचे म्हणणे आहे. 4. प्रसिद्ध मॉडेल बेला हदीद (29) हिने फॅशन उद्योग सोडताना सांगितले की, अतिशय तणावाच्या वातावरणात तिला समाधान मिळत नाही. 5. जस्टिन बीबर आणि एरियाना ग्रांडे यांचा प्रसिद्ध संगीत व्यवस्थापक स्कूटर ब्रॉन (44) यानेही 2024 मध्ये कलाकार व्यवस्थापनातून निवृत्ती घेतली, जेणेकरून तो एक वडील म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष देऊ शकेल. मला आठवते की तरुण पिढीमध्ये ‘क्विटिंग’ हा शब्द नोव्हेंबर 2018 मध्ये तेव्हा चर्चेत आला, जेव्हा यूट्यूब स्टार लिली सिंहने (तेव्हा ती 30 वर्षांची होती आणि आता 37 वर्षांची आहे) तिच्या मुख्य चॅनलवरून तात्पुरती सुट्टी घेण्याची मोठी घोषणा केली होती. तिने मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा हे त्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर, 2019 मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी कलाकार फिल ज्युपिटसने 63 व्या वर्षी स्कॉटलंडच्या डुंडी विद्यापीठात अभ्यासाचा निर्णय घेतला. पण प्रश्न हा आहे की, इतके तरुण कामाच्या सर्वात महत्त्वाच्या वयात काम का सोडत आहेत? यामागे रिकामे राहण्याची इच्छा नसून, त्यांच्या प्राधान्यक्रमात झालेल्या खोल बदलाची ही प्रेरणा आहे. 2025-2026 मध्ये अनेक नोकरीपेशा तरुण कठोर, साचलेपण आणि विषारी वातावरणापासून वाचण्यासाठी स्वेच्छेने काम सोडत आहेत. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. प्रचंड थकवा आणि मानसिक आरोग्य: ‘क्विटिंग’ला आता करिअरचे अपयश म्हणून न बघता स्वतःच्या संरक्षणाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. कर्मचारी अतिथकव्यापासून वाचण्यासाठी काम सोडत आहेत. ते स्वतःच्या हितासाठी ठाम भूमिका घेत आहेत. 2. विषारी वातावरण आणि कमकुवत व्यवस्थापन: येथूनच बदल्याच्या भावनेतून काम सोडण्याचा विचार जन्म घेतो. विषारी वातावरणाला विरोध म्हणून अनेक जण काम सोडून देतात. एका अहवालानुसार 47% कर्मचाऱ्यांनी निराशा व्यक्त करण्यासाठी नोकरी सोडली. 3. लवचिकता आणि घरून कामाच्या सुविधेचा अभाव: महामारीने हे सिद्ध केले आहे की उत्पादकता कार्यालयात उपस्थित राहण्यावर अवलंबून नाही. जबरदस्तीने कार्यालयात बोलावण्याची धोरणे राजीनाम्याचे मोठे कारण आहेत. कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलनाचे महत्त्व वाढले आहे. 4. करिअरमधील साचलेपण आणि प्रगतीचा अभाव: अनेक तरुण व्यावसायिक अशा नोकऱ्या सोडत आहेत ज्यात प्रगतीचे आश्वासन तर दिले जाते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यांना तिथे साचलेपण जाणवते. किमान 57% लोक प्रगती थांबल्याचे जाणवल्यावर नवीन कौशल्ये शिकण्यास तयार आहेत. 5. हेतू आणि मूल्यांचा शोध : जर एखादी नोकरी नीरस किंवा कोणत्याही मोठ्या सामाजिक प्रभावाशिवाय वाटली तर तरुण त्यापासून अंतर राखतात. फंडा हा आहे की, तरुण पिढी पारंपरिक आणि शोषण करणाऱ्या कामाच्या वातावरणापेक्षा मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन करिअरच्या प्रगतीला प्राधान्य देऊ लागली आहे. त्यामुळे उद्योजकांनाही कामाची ठिकाणे टिकवून ठेवण्यावर लक्ष द्यावे लागेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणात नवं वळण! १५ लाख की ६० लाख? आर्थिक व्यवहारातून
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तानाट्यात भाजप OUT? काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष; भाजपची नाराज
धुळ्यात दिव्यांग शिक्षकाच्या बंद घरात चोरी! रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




