उपमहापौराने दालनात लावला टिपू सुलतानचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

image

अजय सोनवणे, साम टीव्ही

मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी त्यांच्या दालनात वादग्रस्त टिपू सुलतान लावल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे मालेगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमांवर दोन्ही बाजूने पडसाद उमटत आहे.

उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या दालनात लावलेला टिपू सुलतानचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याची दखल शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे. महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात येत त्यांनी निषेध नोंदवत फोटो काढण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत फोटो काढत नाहीत, तोपर्यंत आम्ही जोरदार निदर्शन करत राहू, यानंतर हे निदर्शन आंदोलनात परिवर्तन होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

'टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते. भाजपचे एक खासदार यांनी देखील मान्य केले होते की टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. राज्य शासनाने देखील त्यांचा एका अधिसूचना नोंदणी करून त्यांची जयंती साजरी करावी, अस सांगितलं आहे. तर हे विरोध करणारे कोण आहेत, अशा भाषेत उपमहापौर शान ए हिंद यांनी उत्तर दिलं.

एकंदरीतच मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून निर्माण झालेल्या वादात मालेगावातील सत्ताधारी असलेल्या इस्लाम पार्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *