आईचा बॉयफ्रेंड ६ वर्षांपासून मुलीवर अत्याचार करायचा; बहिणीला मारण्याची धमकी

मावळ - आईच्या प्रियकराने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले व तिच्या आई आणि बहिणीला मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्ती केली. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, इंदोरी तसेच भंडारा डोंगराच्या जंगलात २०१४ पासून ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

जनार्दन सोमाजी शिरोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे होते. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच कुणाला संगतल्यास तरूणीच्या आई व बहिणी यांना मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *