
Mumbai : वेगवान आणि आरामदायी सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव तेजस एक्स्प्रेसमधील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. सातत्याने होणारा विलंब, बंद असलेली ‘इन्फोटेनमेंट’ सुविधा आणि वाढीव भाडेदर यामुळे तेजस केवळ कागदावरच प्रीमियम ट्रेन ठरत आहे. ‘चेअर कार’ असल्याने प्रवास बसून करावा लागतो. यामुळे गाडीत शयनयान डब्यांची रचना करावी किंवा तेजसऐवजी वंदे भारत चालवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गाडी क्रमांक 22119/22120 मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी 5.50 वाजता सुटते आणि मडगाव येथे दुपारी 3 वाजता पोहोचते. मडगावहून परतीचा प्रवास दुपारी 3.35 वाजता सुरू होऊन सीएसएमटीत रात्री 12.30 वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सातत्याने तेजस एक्स्प्रेस तीन ते सहा तास विलंबाने धावत आहे. यामुळे मध्यरात्री पोहोचणारी तेजस पहाटे पोहोचत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भरच पडत आहे.
|
|
गाडीत ‘चेअर कार’ डबे असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह, महिला प्रवाशांना विलंबाने पूर्ण होणाऱ्या प्रवासात मनस्ताप सहन करावा लागतो. दुसरीकडे गाडीतील ‘इन्फोटेनमेंट’ सुविधा बंद करण्यात आली आहे. असुविधा असूनही गाडीसाठी ‘प्रीमियम’ दराने प्रवासी भाड्याची आकारणी होते. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सततच्या विलंबामुळे या गाडीच्या विश्वासार्हतेवर प्रवाशांचा पूर्ण विश्वास उडाला आहे. ‘‘तेजस’ गाडीला ना वेग उरला, ना वेळेची शिस्त. धक्कादायक बाब म्हणजे, या गाडीच्या वक्तशीरपणाची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत रेल्वे प्रशासनच मौन बाळगत असल्याने तेजस एक्स्प्रेसचा वाली कोण,’ असा प्रश्न कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी उपस्थित केला आहे.
तेजस एक्स्प्रेसमध्ये शयनयान आसनांचे डबे जोडावेत किंवा तेजस एक्स्प्रेसऐवजी वंदे भारत गाडी चालवावी. कोकण रेल्वेवरील मर्यादित क्षमता, देखभालीसाठी सुरू असणारे ब्लॉक अशी अपरिहार्य कारणे असली, तरी जादा भाडे भरून प्रवाशांची बैठ्या आसनांमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल
- सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
- सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राचा गौरव! 'आयएनएस गुलदार' पाण्याखालील संग्रहालय प्रकल्पास केंद्र सरकारचा प्रतिष्ठित 'गोल्डन बनियन पुरस्कार' जाहीर
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!




























Subscribe to my channel





Enter your invite code to earn your airdrop on Aster https://is.gd/ZceEI6