नगर तालुका : १५ रुपये किमतीची वडा-पावची प्लेट २० रुपयांना का लावली, यावरून झालेल्या वादात एका मजुराचा खून झाला. एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ही धक्कादायक घटना घडली. पप्पू ऊर्फ प्रवीण रमेश कांबळे (वय ३५, रा. दत्त मंदिराजवळ, बोरुडे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शोभा रमेश कांबळे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अमोल बाबासाहेब सोनवणे, अमोल भाऊसाहेब साळवे (दोघे रा. रोकडे मळा, वडगाव गुप्ता रस्ता, नवनागापूर), पुरुषोत्तम कुमार गुप्ता, अरुण नारद शहा, संकेत विठ्ठल सोमवंशी (तिघे रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) व बबड्या ऊर्फ बाबासाहेब केरू गव्हाणे (रा. रोकडे मळा, नवनागापूर) यांचा समावेश आहे.प्रवीण कांबळे हा एमआयडीसीत हमालीचे काम करायचा. मंगळवारी दुपारी प्रवीण व त्याचा मित्र अमोल बोर्डे (रा. निंबळक, ता. नगर) अरुण शहा याच्या सह्याद्री चौकातील रेणुकामाता वडा-पाव सेंटरवर गेले होते. प्रवीणने अरुणकडे वडा-पाव मागितले. १५ रुपयांची प्लेट २० रूपयांना लावल्याने अरुण व प्रवीण यांच्यात बाचाबाची झाली.
त्यावेळी प्रवीणला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तेथून प्रवीण व अमोल बोर्डे दुचाकीवरून निघून गेले. एमआयडीसीतील रस्त्याने ते जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्याकडील लोखंडी गज, कुऱ्हाड, लाकडी दांडक्याने प्रवीणला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी पाच आरोपींना तत्काळ अटक केली.
शहर
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
महाराष्ट्र
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
- सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्या ट्रकला धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू.
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
गुन्हा
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel

