
Pune weather Update : पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे. पुण्यातील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
आयएमडी पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांच्या एक्स हँडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, "आज रात्रीपासून (18 फेब्रुवारी) सक्रिय वारे उत्तर-पश्चिम भारतात धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काही भाग सोडला तर पुण्यात पावसाची शक्यता नाही. 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस उष्णता जाणवणार आहे. राज्यात पावसाची शक्यता आहे पण पुण्यात मात्र उका़डा जाणवणार आहे.
|
|
राज्यात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




