मुंबई: २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि सुरक्षा दलातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन शहरावरील हल्ला रोखला होता. अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी भूमिका बजावली होती. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या सातारा जिल्ह्यातील केडांबे या मूळ गावी भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती आणि त्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या स्मारकाच्या कामात मोठा भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार झाला असून पैशांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली ओंबळे यांनी केला आहे.
स्मारक समिती आणि गैरव्यवहाराचे आरोप
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कामासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये तुकाराम ओंबळे यांच्या पत्नी, कन्या, चुलत भाऊ एकनाथ ओंबळे आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश होता. मात्र, शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या एकनाथ ओंबळे यांनी स्मारकाच्या कामात पैशांचा अपहार केल्याचा आरोप कन्या वैशाली ओंबळे यांनी केला आहे.
काय म्हणाल्या वैशाली ओंबळे?
स्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची माहिती देताना वैशाली ओंबळे म्हणाल्या की, स्मारकासाठी निधी मंजूर झालेला आहे; परंतु समितीमधील काही जणांनी आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यांना समितीमधून बाजूला करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एकनाथ ओंबळे हे आमच्या भावकीतले असून ते वडिलांचे चुलत भाऊ आहेत; मात्र त्यांनी ते सख्खे भाऊ असल्याचा भास निर्माण केला आणि याबाबत आम्ही वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
वैशाली ओंबळे पुढे म्हणाल्या की, “स्मारकाच्या कामात एकनाथ ओंबळे यांनी गैरव्यवहार केल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. ज्यांनी पैसे दिले, त्यांनीच हे भरसभेत कबूल केलेले आहे. जर देणारेच पैसे दिल्याचे सांगत असतील तर यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो?” तसेच एकनाथ ओंबळे हे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. मात्र, त्या तक्रारीवर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करत पारदर्शक पद्धतीने स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी करणार असल्याचे वैशाली ओंबळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोण होते शहीद तुकाराम ओंबळे?
तुकाराम ओंबळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील केडांबे गावचे होते. भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअरमधून नाईक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई पोलिसात हवालदार म्हणून रुजू झाले आणि पुढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर कार्यरत होते. मुंबई पोलिसात रुजू होण्याकरिता त्यांनी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) मध्ये चालून आलेली नोकरीची संधी नाकारली होती.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी ते आणि त्यांची टीम एका चेक पॉईंटवर पहारा देत असताना अपहरण केलेल्या वाहनातून दोन दहशतवादी तेथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. सुरुवातीच्या गोळीबारानंतर एक दहशतवादी गाडीच्या आतच ठार झाला. दुसरा दहशतवादी 'अजमल कसाब' याने वाहनातून बाहेर पडून आत्मसमर्पणाचे नाटक केले. निःशस्त्र ओंबळे त्याच्याजवळ जाताच कसाब उठला आणि त्याने गोळीबार केला. असे असले तरी ओंबळे यांनी तेथून माघार न घेता किंवा पळ न काढता, ते त्याच्यासमोर उभे राहिले आणि कसाबच्या रायफलच्या बॅरलला घट्ट धरून ठेवले, ज्यामुळे इतर कोणीही जखमी झाले नाही. तब्बल २० पेक्षा अधिक गोळ्या ओंबळे यांनी आपल्या छातीवर झेलल्या आणि या अद्वितीय शौर्यात त्यांना वीरमरण आले.
शहर
- पुणे: जुन्नरमध्ये बिबट्याचा थरार..! बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
- पुणे: जुन्नरमध्ये बिबट्याचा थरार..! बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक!
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
गुन्हा
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
























Subscribe to my channel




