पुणे तीन वर्षांपासून रखडलेल्या रखडलेल्या दोन टीपी स्कीमना मंजुरी

पुणे - गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील दोन प्रारूप नगर रचना योजनांना (टीपी स्कीम) (TP Scheme) गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे त्यावर लवकर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गावातून जाणाऱ्या प्रस्ताविक रिंगरोडसाठी  मोफत जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ३५ वर्षांनतर प्रथमच शहरात दोन टीपी स्कीम राबविण्यास महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. तसेच फुरसुंगी येथील आणखी एका टिपी स्कीमच्या प्रारूप योजनेच्या क्षेत्रफळात बदल करण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली. चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या अकरा गावांपैकी फुरसुंगी येथे दोन आणि उरुळी देवाची या गावांमध्ये टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार उरुळी देवाची गावात १०९ हेक्टरवर तसेच फुरसुंगी येथील २६०.६७ आणि २७९.७१ हेक्टरवरील टीपी स्कीम राबविण्याचा इरादा महापालिकेकडून मार्च २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता. एमआरटीपी ॲक्टनुसार दोन वर्षांत या योजनेचे प्रारूप जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळ आणि लॉकडाउन यामुळे या योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मुदत वाढ देण्यात आली होती. महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येण्यास अवघ्या चार दिवसांचा कालावधी राहिला असताना फुरुसुंगी येथील २६० हेक्टर आणि उरुळी देवाची येथील १०९ हेक्टरवरील टीपी स्कीमच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्यास सभेत मान्यता देण्यात आली. तर फुरसुंगी येथील २७९.७९ हेक्टरवरील टीपी स्कीममधील क्षेत्रफळात दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. त्या दुरुस्ती करून प्रारूप योजना जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली. पुणे शहरात गेल्या ३५ ते ४० वर्षांत एकही टीपी स्कीम राबविण्यात आलेली नाही. ज्या भागात टीपी स्कीम होत आहे. त्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या गावांमधील कोणत्या जमिनी मालकांवर अन्याय होणार नाही. तसेच या गावांमधील नागरिकांना सुलभ आणि सर्वसमावेशक आरक्षणे मिळावी असे धोरण भारतीय जनता पक्षाचे होते. तसे पक्षाने जाहीरनाम्यातही आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज हा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करण्यात आला. - गणेश बिडकर, भाजप गटनेते, महापालिका


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply