पुणे - गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील दोन प्रारूप नगर रचना योजनांना (टीपी स्कीम) (TP Scheme) गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे त्यावर लवकर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गावातून जाणाऱ्या प्रस्ताविक रिंगरोडसाठी मोफत जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ३५ वर्षांनतर प्रथमच शहरात दोन टीपी स्कीम राबविण्यास महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. तसेच फुरसुंगी येथील आणखी एका टिपी स्कीमच्या प्रारूप योजनेच्या क्षेत्रफळात बदल करण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली.
चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या अकरा गावांपैकी फुरसुंगी येथे दोन आणि उरुळी देवाची या गावांमध्ये टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार उरुळी देवाची गावात १०९ हेक्टरवर तसेच फुरसुंगी येथील २६०.६७ आणि २७९.७१ हेक्टरवरील टीपी स्कीम राबविण्याचा इरादा महापालिकेकडून मार्च २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता.
एमआरटीपी ॲक्टनुसार दोन वर्षांत या योजनेचे प्रारूप जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळ आणि लॉकडाउन यामुळे या योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मुदत वाढ देण्यात आली होती. महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येण्यास अवघ्या चार दिवसांचा कालावधी राहिला असताना फुरुसुंगी येथील २६० हेक्टर आणि उरुळी देवाची येथील १०९ हेक्टरवरील टीपी स्कीमच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्यास सभेत मान्यता देण्यात आली. तर फुरसुंगी येथील २७९.७९ हेक्टरवरील टीपी स्कीममधील क्षेत्रफळात दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्या दुरुस्ती करून प्रारूप योजना जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली.
पुणे शहरात गेल्या ३५ ते ४० वर्षांत एकही टीपी स्कीम राबविण्यात आलेली नाही. ज्या भागात टीपी स्कीम होत आहे. त्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या गावांमधील कोणत्या जमिनी मालकांवर अन्याय होणार नाही. तसेच या गावांमधील नागरिकांना सुलभ आणि सर्वसमावेशक आरक्षणे मिळावी असे धोरण भारतीय जनता पक्षाचे होते. तसे पक्षाने जाहीरनाम्यातही आश्वासन दिले होते. त्यानुसार आज हा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करण्यात आला.
- गणेश बिडकर, भाजप गटनेते, महापालिकाहे पण वाचा-
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




