
औरंगाबाद: प्रेमाला जात-पात नसते असं म्हटलं जातं. पण, 'जात' जाता जात नाही हेही एक कटू सत्यच आहे. एका तरुण-तरुणीने जातीची बंधनं तोडत एकमेंकावर प्रेम केलं. प्रेमात ते इतके वाहून गेले की, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर अनेकादा त्यांच्यात प्रेमाचे हे क्षण येत गेले. तिला वाटलं की, आता या प्रेमाचं रुपांतर नात्यात करावं, त्यासाठी तिने त्याला लग्नाची मागणी केली आणि इथंच सारं बिनसलं. तिच्या वाटेला जे आलं त्याने 'जात जाता जात नाही' ही म्हण खरी ठरल्याचा प्रसंग औरंगाबादमध्ये घडला आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीला जात जुळत नाही म्हणून लग्नाला नकार दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्न होण्याअगोदरच शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाच्या वेळी जात जुळत नसल्याचं कारण देत लग्न करण्यास एका जातीवादी तरुणाने त्याच्या प्रेयसील नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धा परिक्षेची तयारी करताना या दोघांची मुंबईत भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली. या भेटी पुढे वाढतच गेल्या आणि पुढे याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक प्रस्थापित झाले, दोघांनीही अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आता या संबंधांचं पवित्र नात्यात रुपांतर व्हाव म्हणून तरुणीने तिच्या प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. मात्र प्रेयसीने लग्नाची मागणी करताच आपल्या दोघांची जात वेगळी आहे असं म्हणत आपली जात जुळत नाही असं कारण त्याने पुढे केलं आणि लग्नाला साफ नकार देत हा तरुण मोकळा झाला.
नकार मिळाल्याने त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकरली. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याला सर्वस्व अर्पण केलं त्याने केवळ जातीचं कारण सांगत नकार दिल्याने ती तरुणी खचली होती. तरीही तिने अनेक दिवस त्याच्या होकाराची वाट पाहिली. मात्र एवढं करुनही त्याच्याकडून काहीच उत्तर मिळत नसल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश असं त्या तरुणाचं नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील गणोरे इथला असून सध्या पैठणमध्ये राहतो. या घटनेवरुन प्रेम करताना आता जात पाहून प्नेम करावा का? आणि कुणावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न पडतो.
शहर
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई! ६३ लाख बोगस शिधापत्रिका (Ration Cards) रद्द होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
महाराष्ट्र
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
गुन्हा
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.






















Subscribe to my channel




