पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. ५८ आमदारांच्या बंडानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या (TMC) संसदीय पक्षात मोठी विभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील किमान २२ खासदार बंड करून स्वतःला 'खरी टीएमसी' घोषित करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यातील १६ खासदारांचे फोनही सध्या बंद येत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
पक्षातील या बंडाळीमुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी आठवड्यात 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत येणार आहेत, अशा वेळी पक्षातील हे अंतर्गत संकट त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पश्चिम बंगालमध्ये आधीच आमदारांच्या बंडामुळे ममता सरकार अडचणीत असताना, आता दिल्लीत खासदारांच्या बंडामुळे पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. बंगालमध्ये सध्या 'महाराष्ट्र पॅटर्न'ची पुनरावृत्ती होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय (२०८ जागा) आणि टीएमसीचा पराभव (८० जागा) झाल्यानंतर पक्षात अस्वस्थता पसरली आहे.
बंडखोर आमदार रिताब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ५८ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे स्वतःला वेगळा गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. या ५८ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर रिताब्रता बॅनर्जी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींची तुलना महाराष्ट्रातील राजकीय फुटीशी केली जात आहे.
खासदारांच्या पातळीवरील फूट:
विधानसभेपाठोपाठ आता टीएमसीच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार, पक्षाचे १८ ते २२ खासदार बंड करून स्वतःला 'खरी टीएमसी' घोषित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे बंडखोर खासदार ८ जून रोजी लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन, काकोली घोष दस्तीदार यांची लोकसभेतील पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी करू शकतात.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




