मुंबई: भांडुपमधून एक अत्यंत खळबळजनक आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी घटना समोर आली आहे. नियमित आरोग्य राखण्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका युवकावर अज्ञात गुंडाने अचानक प्राणघातक हल्ला केला. नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चाकूने वार करत त्याच्याकडील रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून कसून तपास सुरू आहे.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तनूज सांगळे (वय ३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तनूज सांगळे हे शुक्रवारी पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास आपले मित्र शैलेश गुप्ता आणि ऋषी गुप्ता यांच्यासोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते भांडुपमधील सन्मान सिंह रोड, खिराडे कंपाउंड, गणेशनगर परिसरात आले असता, तिथे आधीपासूनच असलेल्या नितेश अनभुले या संशयिताने त्यांचा रस्ता अडवला.
रस्ता अडवून संशयिताने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नशा करण्यासाठी दोन हजार रुपयांची तातडीची मागणी त्याने तनूज सांगळे यांच्याकडे केली. एवढ्या सकाळी आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगत तनूज यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
चाकूने वार आणि नागरिकांमध्ये भीती: पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नितेश अनभुले याने त्यांना अरेरावी करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि अचानक स्वतःकडील धारदार चाकू बाहेर काढला. काही समजण्याच्या आतच त्याने तनूज सांगळे यांच्या उजव्या हातावर चाकूने वार करून त्यांना रक्तबंबाळ केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी जीवाच्या अकंताने मदतीसाठी आरडाओरडा केला. बुवाचा आवाज ऐकून त्यांचे मित्र तसेच परिसरातील इतर नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. परंतु, आरोपी नितेश याने हातातला उघडा चाकू हवेत फिरवत जर कोणी मध्ये आले तर त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिक जवळ येण्यास घाबरले. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी तिथून पसार झाला.
या प्रकरणी जखमी तरुण तनूज सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भांडुप पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितेश अनभुले याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
शहर
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
महाराष्ट्र
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- कोल्हापूर: आजऱ्यात बिबट्याचा थरार; मोर पकडण्यासाठी मारली तब्बल सात फूट उंच उडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
- बीड: डीपीचे काम करताना खांबावरच विजचा तीव्र धक्का बसून कामगाराचा मृत्यू; सहाय्यक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल.
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel


