
Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून कौटुंबिक संपत्तीवरून भांडणे, टोळीयुद्ध आणि आर्थिक वर्चस्ववादातूनच झाल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे बुधवारी विशेष न्यायालयात करण्यात आला.
आरोपनिश्चितीला सुरुवात
वनराज आंदेकर खून प्रकरणात त्याची बहीण संजीवनी, जावई जयंत, गणेश व प्रकाश कोमकर आणि टोळीप्रमुख सोम्या ऊर्फ सोमनाथ गायकवाडसह २१ आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपनिश्चितीला सुरुवात झाली. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गुन्ह्याचे स्वरुप, आरोपींविरोधातील आरोप आणि पुराव्यांची मांडणी केली. घटनेचे आणि आरोपी फरार असतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चित्रफिती, घटनास्थळाचा पंचनामा, ३९ साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाइल कॉल डिटेल्स अहवाल, त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणी अहवाल, वैद्यकीय अहवाल आदी भक्कम पुरावे त्यांनी सादर केले.
१७०० पानांचे आरोपपत्र
वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ आरोपींविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सादर केले आहे. हल्लेखोरांनी वापरलेली आठ पिस्तुले, सात कोयते व १३ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपींनी मध्य प्रदेशच्या सीमेवरील गावातून पिस्तुले आणि काडतुसे आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींपैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपी सोमनाथ गायकवाडच्या टोळीचा सदस्य निखिल आखाडेचा ऑक्टोबर २०२३ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात ‘मकोका’त अटक झालेले आरोपी बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वनराज आंदेकर नगरसेवक असल्यानेच आरोपींना जामीन मंजूर झाल्याचा राग सोमनाथला होता. वनराज आणि त्याची बहीण संजीवनी व जावई कोमकरांमध्ये संपत्तीवरून भांडणे होती.
कारवाईच्या संशयातून आरोपी संतापलेले
पुणे महापालिकेने आरोपी संजीवनी कोमकर हिच्या नाना पेठेतील जनरल स्टोअर्सवर अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. वनराजच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याच्या संशयातून आरोपी संतापले होते. त्यातून गायकवाड आणि कोमकर एकत्र आले. त्यांनी वनराजचा खून करण्याचा कट रचला. त्याच्यावर पाळत ठेवून दोन वेळा खून करण्याचा प्रयत्नही केला. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी नाना पेठेतील वीज बंद करून आरोपींनी वनराजवर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला.
पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून पुरावे संकलित केले आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात आरोप निश्चित करावेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाचे तपास अधिकारी व बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्याने पुढील तारखेलाही आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




