रोहित पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel: सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करावी यासाठी 35 आमदारांनी आणि 32 प्रमुख पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. या पत्रावर 35 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पण 5 आमदारांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही असा दावा करत, त्यांना सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ वाटत नाही का? असा बॉम्बगोळा रोहित पवार यांनी टाकला. 5 ते 6 लोकांनी स्वाक्षरी केलेली नाही, असा आरोप करत रोहित पवार यांनी या नेत्यांकडे मोर्चा वळवला. त्यांनी या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला.
35 आमदारांचे केले अभिनंदन
रोहित पवार यांनी यापूर्वी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडावे यासाठी पाठिंबा देणाऱ्या 35 आमदारांचे अभिनंदन केले. ज्या 35 आमदारांनी सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष प्रस्तावित केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जवळपास 32, 33 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कागदावर लिहून दिले आहे की सुनेत्रा काकीच अध्यक्ष असाव्यात. घोषणा कोणीही केली असली तरी, तिथले आमदार आणि पदाधिकारी सुनेत्रा काकींच्या सोबत आहेत हे महत्त्वाचे आहे. त्यांना आमचा बाहेरून पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
त्या 5 आमदारांचा विरोध?
तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पाठिंब्याच्या पत्रावर पाच आमदारांच्या स्वाक्षरी नाही. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ नये असे त्यांना वाटते का? स्वाक्षरी करणारे 35 आमदार दादांच्या विचारांचे आहेत. तर या पाठिंब्याच्या पत्रावर पाच ते सहा आमदारांनी स्वाक्षरी केलेली नाही. स्वाक्षरी न करणार्यांना सुनेत्रा पवार अध्यक्ष होऊ नये असं वाटतं का? रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. स्वाक्षरी न केलेल्या पाच ते सहा जणांच्या मनात कदाचित काही वेगळं असावं. त्यातील एकाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या 35 लोकांनी पाठिंबा प्रस्तावावर स्वाक्षरी केली. ते दादांच्या विचारांचे आहेत. जे दादांच्या विचारांचे आहेत, ते आमच्या विचारांचे आहेत. या पाच-सहा आमदारांनी आणि इतर काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा प्रस्तावावर का स्वाक्षरी केली नाही, असा सवाल करत ही लोकं कोण आहेत हे जनतेला माहिती आहेत असे मोठे वक्तव्य सुद्धा रोहित पवार यांनी केले आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे हे समोर आले.
अजितदादांवरील AI व्हिडिओचं प्रसारण थांबवा अन्यथा गुन्हा
तर अजितदादांवरील एआयद्वारे बनवलेले व्हिडिओ प्रसारीत करणं थांबवा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दादांच्या आवाजात खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य प्रसारित केली जात आहेत. हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्याचे ते म्हणाले. हा प्रकार लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असल्याचे तटकरे म्हणाले. त्यांनी याविषयीवर निवेदन जारी केले आहे.
[embedded content]
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



