पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी

पुणे: महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ (टाक्या) आणि पंपिंग केंद्रांमध्ये विविध तातडीची विद्युत आणि पंपिंग विषयक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण दुरुस्ती कामांमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभातर्फे देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या पर्वती एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित विविध टाक्या आणि पंपिंग यंत्रणेची नियमित देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. ही दुरुस्तीची कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने या कालावधीत वीज पुरवठा आणि पंपिंग यंत्रणा तात्पुरती स्वरूपात बंद ठेवावी लागणार आहे, ज्यामुळे नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा व प्रभावित होणारा प्रमुख परिसर खालीलप्रमाणे आहे:

  • पर्वती एमएलआर टाकी परिसर: गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, कात्रज गेट, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवारी पेठ, अर्जुन बेडे स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ आणि पर्वती दर्शन.

  • पर्वती एचएलआर टाकी परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, लोअर व अपर इंदिरानगर, शिवदर्शन, बिबवेवाडी गावठाण, औंधकरनगर, गंगाधाम, शेलार मळा, टिळक वसाहत, पर्वती गावठाण, मितानगर, कुमार पृथ्वी तसेच कोंढवा खुर्दचे काही भाग.

  • पर्वती एलएलआर टाकी परिसर: शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर आणि स्वारगेट परिसर.

  • वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग स्टेशन परिसर: हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द-बुद्रूक, येवलेवाडी, सहकारनगरचा काही भाग, दाते वसाहत, संतोष नगर, दत्तनगर, बाणेर सिटी, मोझा, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर, शेलार मळा, कात्रज गावठाण, जुना प्रभात ३५ व ४५ विभाग.

  • इतर प्रभावित परिसर: खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, धनेकर नगर, यशवंतनगर, चंदननगर, गणेशनगर, आनंदपार्क, महादेवनगर, माळवाडी तसेच लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, गांधी भवन, पंचकाई क्लब, जीएसआर टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, एएलआर, चतुःशृंगी टाकी, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल आणि खडकवासला-नांदेड बुस्टर पंपिंग अंतर्गत येणारे इतरही काही परिसर या शटडाऊनमुळे प्रभावित होणार आहेत.

महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या पूर्व नियोजित पाणीकपातीची नोंद घेऊन आधीच आवश्यक ते पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा वापर अत्यंत मितव्ययтуपूर्वक करावा, तसेच सहकार्य करावे.

पुणेकरांनो लक्ष द्या..! गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी पाणी कमी दाबाने येणार



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *