संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये संभाषणाची सुरुवातीची वाक्ये, पाहुणे व मित्रांना शुभेच्छा देण्याच्या आयडियाज लिहिण्यातही त्याची मदत घेतो. तो विचारतो की, जर कोणी असा अवघड प्रश्न विचारला की ‘लग्न कधी करत आहेस?’ तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एआय त्याची मदत करतो. समजा संभाषण अशा एखाद्या पुस्तकावर किंवा लेखावर गेले, ज्याची अजयला माहिती नाही, तर तो लगेच एआयकडे सारांश मागवतो. जोपर्यंत एआय सारांश बनवतो, त्या क्षणांमध्ये अजय एक ओळ म्हणत राहतो की, ‘मी कधीतरी वाचतो.’ असे नाही की अजय स्वतः विचार करू शकत नाही, पण एआय गोष्टी थोड्या सोप्या करून देतो. 20 वर्षांचा अजय तरुणांच्या वेगाने वाढणाऱ्या त्या गटाचा भाग आहे, जे अगदी मानवी कामेसुद्धा एआयकडून करून घेत आहेत. लहान-मोठ्या सामाजिक भीतीचा (सोशल अँक्झायटीचा) सामना करणारे अनेक तरुण अजयप्रमाणेच समोरासमोर भेटण्यापूर्वी एआयची मदत घेतात. सामान्य व्हॉट्सॲप चॅटमध्येही आता बॉट-जनरेटेड मेसेज दिसू लागले आहेत, पण या वयाच्या रोमँटिक पार्टनर्समध्ये यांची संख्या बऱ्याच अंशी आहे. अचानक त्यांचे टेक्स्ट अचूक व्याकरणाचे होऊ लागतात. वास्तवात समोरची व्यक्ती हे जाणते की ही तीच व्यक्ती आहे, जी साध्या ओळीसुद्धा पाच चुकांशिवाय लिहू शकत नाही. अनेक नाती तर घट्ट होण्यापूर्वीच तुटू लागली आहेत. एक पार्टनर अशी इच्छा बाळगतो की संभाषण थोडे विस्तारलेले असावे, कारण आपलेपणा त्याच अनौपचारिकतेतून येतो. ही परिपूर्णता यासाठी येते, कारण चॅटबॉट्स मानवी भाषेचे पॅटर्न जोडून वाक्ये बनवतात. मी एका अशा मुलीला ओळखतो, जिने आपले नाते म्हणूनच संपवून टाकले, कारण तिला वाटले की ती ज्या मुलाला डेट करत होती, तो इतका आळशी आणि प्रेमाच्या बाबतीत निरस आहे की, त्याने त्यांचे संभाषणसुद्धा एआयच्या हातात सोपवून दिले. ब्लॉक करण्यापूर्वी तिने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले की, ‘हे विचित्र आहे की तुझ्या प्रेमाचे शब्दही तुझे नसून एआय जनरेटेड आहेत.’ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एश्ली गोल्डन म्हणतात की, ‘हे दोन्ही बाजूंसाठी नुकसानदायक आहे. चॅटबॉट्सचा उद्देश उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) वाढवणे हा होता, नाती बनवणे नाही.’ जर तुम्ही असे तरुण असाल, जो आपला प्रत्येक टेक्स्ट एआयकडून तपासून घेत आहे, तर तुम्ही स्वतःला हेच शिकवत आहात की तुमची स्वतःची समज विश्वासपात्र नाही. ही गोष्ट विशेषतः अशा लोकांना जास्त लागू होते, ज्यांना सामाजिक भीती (सोशल अँक्झायटी) असते. गोल्डन मानतात की एआय लोकांना सोशल मिसस्टेप्सच्या वेदनेपासून वाचवू शकतो, पण हा दिलासा तात्पुरता असतो. हळूहळू हेच टूल कुबड्या बनते आणि लोक स्वतःच्या निर्णयांवरच कमी विश्वास ठेवू लागतात. आज अनेक एक्झिक्युटिव्हज् जेव्हा व्यवस्थापनाच्या नोटीसला रागारागात रिप्लाय लिहितात, तेव्हा तो एआयच्या मदतीने सुधारण्याचा प्रयत्न करतात. आधी मनातील भाव लिहिणे आणि नंतर त्यांना एआयच्या माध्यमातून भाषेत ढकलणे घेणाऱ्या व्यक्तीला थोड्या गोंधळात टाकते. भाषा जरी उत्तम होत असली, तरी पत्रातील भावना कोणतीही स्पष्ट भूमिका दर्शवत नाहीत. अनेकदा मित्रांशी समोरासमोर संवाद साधण्यासाठी एआयचा आधार घेणे तरुणांवर उलटलेदेखील आहे आणि नंतर गोल्डन यांनी त्यांचे समुपदेशन केले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या कठीण संभाषणाच्या तयारीसाठी एआयचा वापर करणे योग्य आहे, पण संपूर्ण संभाषण त्याच्या भरवशावर असू नये. एआय हे सांगू शकतो की काय बोलायचे आहे, पण कसे बोलायचे हे प्रत्येक व्यक्तीला स्वतः शिकावे लागेल. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, मोठ्या इव्हेंट्स किंवा क्लायंट्सची उत्तरे तयार करण्यापर्यंत एआयचा वापर ठीक आहे, पण भावनिक संभाषणाची स्क्रिप्ट लिहून घेणे बॅकफायर करू शकते. कारण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. फंडा असा की, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एआयकडून पॉलिश करून घेतली, तर हळूहळू तुम्ही स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वावरील विश्वास गमावून बसाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यूजीसी-नेट परीक्षेच्या निकालाला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली चिंता; करिअर आणि पीएचडी प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर
- पुणे: नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून ट्रकला धडकला, कारही चिरडली; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- पुणे: यूजीसी-नेट परीक्षेच्या निकालाला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली चिंता; करिअर आणि पीएचडी प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर
- पुणे: नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून ट्रकला धडकला, कारही चिरडली; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रसिद्ध धबधबा पर्यटकांसाठी बंद, आता केवळ रस्त्यावरूनच घेता येणार आनंद
गुन्हा
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज


























Subscribe to my channel




