पुणे: लोहगाव-हरणतळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री एका घराच्या आवारात घुसून बिबट्याने पाळीव श्वानाची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी सुरू करत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
माहितीनुसार, हरणतळे परिसरात राहणारे यमराज अशोक खांदवे यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये पहाटे सुमारे दोनच्या सुमारास बिबट्याने पाच फूट उंच भिंतीवरून उडी मारत प्रवेश केला. घराच्या आवारातील पाळीव श्वानावर झडप घालत त्याला जबड्यात पकडून तो पुन्हा भिंतीवरून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वान दिसत नसल्याने कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा थरारक प्रकार उघड झाला.
घटनेनंतर घरापासून काहीशे मीटर अंतरावर श्वानाचा मृतदेह आढळून आला. लोकवस्तीच्या अगदी जवळ बिबट्याने वावर केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार बापूसाहेब पठारे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने असल्याच्या तक्रारी येत असतानाही यापूर्वी ठोस पुरावा नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्याचे निर्देश देण्यात आले.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेत योग्य ठिकाणी पिंजरा उभारण्याची तयारी सुरू आहे. तसेच बिबट्या पकडला जाईपर्यंत नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
"आमचा पाळीव कुत्रा दिसत नसल्याने आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी बिबट्याने घरात घुसून श्वानाला उचलून नेल्याचे दिसले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यमराज अशोक खांदवे, रहिवासी, हरणतळे, लोहगाव'
शहर
- नागपूर: पत्नीचा निर्वाह खर्च भागवण्यास नकार देणे म्हणजे आर्थिक छळ; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- छत्रपती संभाजीनगर: हजारो पदे रिक्त, कामगारांवर ताण! प्रलंबित पदोन्नती अन् भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर
- अमरावती: मुलीच्या संसारासाठी सासू सरसावली; स्वतःची किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन;
महाराष्ट्र
- नागपूर: पत्नीचा निर्वाह खर्च भागवण्यास नकार देणे म्हणजे आर्थिक छळ; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- कोल्हापूर: शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९० व्या वर्षी निधन; शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील मोठी हानी
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
गुन्हा
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




