सातारा : आईसोबत आजोळी आलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा आजीमागे धावताना शोषखड्ड्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी दोनच्या सुमारास लिंब आवळीमाथा (ता. सातारा) येथे घडली. हर्ष स्वप्निल लोंढे (रा. बेलवडे, ता. सातारा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.सातारा तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षचे वडील सैन्यदलात कार्यरत आहेत. सध्या त्यांचे पोस्टिंग पुणे येथे आहे. हर्ष आईसोबत आजोळी लिंब येथे आला होता. गुरुवारी दुपारी शेतात निघालेल्या आजीच्या मागे तो निघाला होता. आजी काही अंतरावर पुढे गेल्याने धावताना तो रस्त्याकडेच्या शोषखड्ड्यात पडला.
हा प्रकार लक्षात येताच आजीने आरडाओरडा केला. परिसरातील दोन तरुणांनी सुमारे १० फूट खोल शोषखड्ड्यात उडी घेऊन हर्षचा शोध घेतला. मात्र, यात यश आले नाही.त्यानंतर हर्षचे चुलत आजोबा पांडुरंग रामचंद्र सावंत (वय ५३, रा. लिंब) यांनी शोषखड्ड्यातून हर्षला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याबाबत पांडुरंग सावंत यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात वर्दी दिली.
कुटुंबीयांना धक्का
चिमुकल्या हर्षचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या आईची १५ दिवसांपूर्वीच प्रसूती झाली आहे. हर्षच्या दुर्दैवी मृत्यूने लिंब आणि बेलवडे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली.
शोषखड्ड्यांचा धोका
या घटनेने गावागावातील उघड्या शोषखड्ड्यांचा धोका स्पष्ट झाला. लहान मुले पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी शोषखड्डे बंदिस्त करावेत किंवा त्याभोवती संरक्षक कठडे तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त

























Subscribe to my channel




