पुणे:लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा १२९ वा वर्धापन दिन; महापौर मंजुषा नागपुरे व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते महाआरती

पुणे: श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरात महाआरती संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले.

महाआरतीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी दत्तगुरूंच्या चरणी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना केली. त्यांनी लहानपणापासून या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे सांगत महाआरतीचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना व्यक्त केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही सपत्नीक महाआरती करत दत्तगुरूंचे दर्शन घेतले. पुणेकरांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडताना मंदिरात येण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन आणि विश्वस्त मंडळाचे त्यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार सूरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, जान्हवी धारिवाल-बालन तसेच इतर विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित होते. महाआरतीनंतर संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *