वाशिम: एक अत्यंत संतापजनक, खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या आपल्याच पतीचा पत्नीने तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने अतिशय थंड डोक्याने काटा काढल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांच्या आत मालेगाव पोलिसांनी छडा लावत हत्येचे मोठे रहस्य उलघडले आहे. पतीची हत्या करून मृतदेह शेतात फेकून देणाऱ्या मृताच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) हे चार-पाच दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथील आपल्या सासरवाडीत आले होते. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील एका शेतात सुरेश यांचा मृतदेह अत्यंत संशयास्पद आणि गूढ परिस्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृताची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा कथित प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळनाथ) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
पोलिस बडग्यासमोर आरोपींनी गुन्ह्याची सविस्तर कबुली दिली आहे. मृत सुरेश झळके हा त्याच्या पत्नीच्या आणि आरोपी प्रियकराच्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये सतत मोठा अडथळा ठरत होता. यातूनच त्याला कायमचा संपवण्याचा कट रचण्यात आला. ठरलेल्या बेथ्यानुसार, ३० जुलै रोजी आरोपींनी सुरेश यांना सर्वप्रथम जबरदस्तीने मद्यपान (दारू) करण्यास प्रवृत्त केले आणि ते पूर्णपणे नशेत झाल्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हा खून लपविण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचा मृतदेह शेतात आणून टाकला. सुरुवातीला याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कसून तपासात पत्नीचाच हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
गुन्हा
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
























Subscribe to my channel




