बाणेर (पुणे): शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील उच्चभ्रू बाणेर-बालेवाडी परिसरात ड्रग्ज माफियांनी आपले जाळे पसरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाणेर येथील हायवे लगतच्या सेवा रस्त्यावर (Service Road) मोठ्या प्रमाणावर वापरलेल्या सिरिंज (ड्रग्जच्या सुया) आणि औषधांच्या रिकाम्या बाटल्या उघड्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून, स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शाळा आणि निवासी परिसराजवळ थेट धोका: ज्या सेवा रस्त्यावर या वापरलेल्या सिरिंज आढळल्या आहेत, त्याच्या अगदी जवळ अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि मोठी निवासी संकुले (Housing Societies) आहेत. लहान मुले, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून रोज ये-जा करतात. उघड्यावर टाकलेल्या या वापरलेल्या सिरिंजमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा आरोग्यविषयक धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बालेवाडीतील एमडी ड्रग्ज कारवाईची पार्श्वभूमी: काही दिवसांपूर्वीच (२६ जून रोजी) बालेवाडी परिसरात पोलिसांनी मुंबईहून आलेल्या एका कारमधून तब्बल ९८ ग्रॅम मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ आणि सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली होती. ही कारवाई ताजी असतानाच आता बाणेरच्या सेवा रस्त्यावर थेट वापरलेल्या सिरिंज मिळून आल्याने या परिसरात ड्रग्ज तस्करी आणि सेव्हन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांकडे रात्रीची गस्त व कडक कारवाईची मागणी: रात्रीच्या वेळी निर्जन आणि कमी दिव्यांचा प्रकाश असलेल्या सेवा रस्त्यांचा वापर गर्दुल्ले आणि ड्रग्ज विक्रेते करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिस ठाण्याने या परिसरात रात्रीची गस्त (Patrolling) वाढवावी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी आणि ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करून हा परिसर सुरक्षित करावा, अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर



























Subscribe to my channel



