मुंबई: इलेक्ट्रिक स्कूटर चोरी करून मोठा धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत चोरट्यांच्या दुकलीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. मोहसीन अकबरअली मालतबडे (वय २५, रा. जोगेश्वरी) आणि अरफात हाफीज शेख (वय २२, रा. कुर्ला) असे अटक करण्यात आलेल्या दोन मुख्य आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी मुंबईतील विविध भागांतून इलेक्ट्रिक स्कूटर चोरून दहशत निर्माण केली होती. एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत तब्बल ६ लाख १८ हजार रुपयांच्या एकूण ११ इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आल्या असून, या यशस्वी कारवाईमुळे शहरातील विविध भागांतील वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओपस सेंटरसमोर पार्क केलेली वैभव गुप्ता (वय २२) यांची इलेक्ट्रिक स्कूटर २० जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी स्कूटर मालकाने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम नायर आणि गुन्हे विभागाचे निरीक्षक सुनील करांडे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक किरण पर्बत, शिपाई जाधव, लोखंडे, अवघडे, कदम, पवार तसेच तांत्रिक मदतीसाठी अंमलदार विशाल पिसाळ यांच्या पथकाने कसून तपास मोहीम राबवली आणि संशयितांचा शोध घेतला.
तपास दरम्यान आरोपींनी केवळ एमआयडीसी परिसरच नव्हे, तर मुंबई सेंट्रल, चांदीवली, चर्नी रोड, विक्रोळी, दादर, वाकोला, अंधेरी आणि वरळी यांसारख्या मुंबईतील विविध नामांकित व महत्त्वाच्या भागांतून अनेक इलेक्ट्रिक स्कूटर चोरल्याची कबुली दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची या कारवाईमुळे उकल झाली असून, अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांचाही सखोल तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे इलेक्ट्रिक स्कूटर चोरी करणाऱ्या एका मोठ्या व खतरनाक रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहर
- नागपूर: आई-वडिलांच्या अहंकाराची शिक्षा चिमुकलीला; कौटुंबिक वादात ९ महिने शाळेपासून दूर ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा संताप
- अमरावती: मेळघाटात अंधश्रद्धेचे काळे सावट; उपचाराच्या नावाखाली अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकल्या बाळाच्या पोटाला दिले गरम सळईचे चटके, महिला भूमकावर गुन्हा दाखल
- पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे व जळगावला 'रेड अलर्ट'!
- यवतमाळ: मोबाईलवरून मदतीची आर्त हाक, पण कार नदीत बुडाल्याने काळाने तिघांवर साधला घाला
महाराष्ट्र
- नागपूर: आई-वडिलांच्या अहंकाराची शिक्षा चिमुकलीला; कौटुंबिक वादात ९ महिने शाळेपासून दूर ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा संताप
- जळगाव: शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे ५० ते ६० घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
- जळगाव: मुसळधार पावसात आगीचे तांडव! शॉर्ट सर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- अमरावती: मेळघाटात अंधश्रद्धेचे काळे सावट; उपचाराच्या नावाखाली अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकल्या बाळाच्या पोटाला दिले गरम सळईचे चटके, महिला भूमकावर गुन्हा दाखल
गुन्हा
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई



























Subscribe to my channel




